Tina Datta : 'बिग बॉस' मुळे टीना दत्ताचं नशीबच उजळलं, मोठ्या चित्रपटाची मिळाली ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2023 05:26 PM2023-01-25T17:26:48+5:302023-01-25T17:38:05+5:30

बिग बॉस च्या घरातून बाहेर पडल्यानंतर अनेकांचे करिअर बनते तक काही जणांचे संपते सुद्धा. टीना दत्ताला मात्र थेट चित्रपटाचीच ऑफर मिळाली आहे.

बिग बॉस सीझन १६ सर्वात धमाकेदार सीझन मानला जातोय. काही ना काही कारणाने शो चर्चेत आहे. आणि त्यातही एक चेहरा सतत पुढे दिसतोय तो म्हणजे उतरन फेम अभिनेत्री टीना दत्ता.

टीना दत्ता बिग बॉस मधील लोकप्रिय आणि ताकदीची स्पर्धक आहे. अनेकदा ती होस्ट सलमान खानच्या निशाण्यावरही असते. तर कधी शालीन भनोतसोबतच्या अफेअरमुळे चर्चेत असते.

पण टीनाचे घरातून बाहेर आल्यानंतर नशीबच उजळणार आहे. होय टीना ला मुख्य अभिनेत्री म्हणून एक दाक्षिणात्य चित्रपट ऑफर झाला आहे. ती घरातून बाहेर आल्यानंतर तिला सिनेमा ऑफर होण्याची शक्यता आहे.

हा सिनेमा तेलुगू भाषेतील असणार आहे. एका बड्या राजकारण्याच्या मुलीची ही भूमिका असणार आहे. सिनेमात तिचे पात्र तिच्या वडिलांसोबत काम करणाऱ्या एका मुलाच्या प्रेमात पडते असे आहे. अजुन सिनेमाविषयी अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

टीना ने हा चित्रपट स्वीकारल्यास तिचे हे साऊथ फिल्म इंडस्ट्रीत पदार्पण असेल. टीनाने वयाच्या ५ व्या वर्षापासूनच अभिनयाला सुरुवात केली होती. तिने अनेक बंगाली सिनेमांमध्ये काम केले आहे.याशिवाय टीना खतरो के खिलाडीमध्येही सहभागी झाली होती.

टीना चा जन्म कोलकत्याचा असून तिने पोल डान्सिंग आणि किकबॉक्सिंगमध्येही प्रशिक्षण घेतले आहे. २०१९ मध्ये टाईम्स ऑफ इंडिया मोस्ट डिझायरेबल वुमन्स लिस्ट मध्ये टीना १९ व्या क्रमांकावर होती.

कलर्स वाहिनीवरील उतरन या हिंदी मालिकेमुळे ती घराघरात पोहोचली. मालिकेतील इच्छा या भूमिकेमुळे तिला वेगळी ओळख मिळाली.

आता टीना बिग बॉस मुळे चांगलीच लोकप्रिय झाली आहे. टीना ला सिनेमात बघण्यासाठी तर चाहते नक्कीच उत्सुक आहेत.