प्रेग्नेंट सना खानला इफ्तार पार्टीतून ओढत नेणार तिचा पती मुफ्ती अनस आहे तरी कोण?, नेटकऱ्यांनी केलंय त्याला ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2023 03:28 PM2023-04-17T15:28:46+5:302023-04-17T15:44:28+5:30

प्रेग्नेंट सनाला भर कार्यक्रमातून ओढत नेल्याने मुफ्ती अनसच्या या कृतीवर नेटकरी संतापले आहेत.

इस्लामसाठी अभिनयक्षेत्र सोडणाऱ्या सना खानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. बाबा सिद्दीकींच्या पार्टीत पतीबरोबर पोहोचलेली सना खान तिच्या पतीच्या कृतीमुळे चर्चेत आली आहे. (फोटो इन्स्टाग्राम)

व्हिडिओमध्ये सना खान थकल्याचं स्पष्ट दिसत आहे. यामध्ये ती थकल्यामुळे आता काही करू शकणार नाही, असेही नवऱ्याला सांगत आहे. पण तो तिचं न ऐकता तिला ओढत घेऊन जातो. मुफ्ती अनसच्या या कृतीवर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

सनाने २०२०ने मुफ्ती अनसाशी लग्नगाठ बांधली. बॉम्बे टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत सनाने तिच्या व सईद अनसच्या पहिल्या भेटीबद्दल सांगितले. सना व सईदची पहिली भेट 2017 मध्ये झाली. (फोटो इन्स्टाग्राम)

यानंतर 2020 मध्ये आम्ही पुन्हा संपर्कात आलोत. अनससोबत निकाह करण्याचा निर्णय मी एका रात्रीत घेतला नाही. त्याच्यासारखा शौहर मिळावा म्हणून मी अनेक प्रार्थना केल्या होत्या.(फोटो इन्स्टाग्राम)

लग्नानंतर सना प्रचंड ट्रोल झाली, यावरही ती बोलली. लोकांना माझ्या लग्नाशी काहीही देणेघेणे नाही. माझे शौहर चांगले व्यक्ति आहेत. लोकांना ते आवडत नसतील पण मला आवडतात. लोक काय म्हणतात, याची मला पर्वा नाही, असे ती म्हणाली होती.(फोटो इन्स्टाग्राम)

आता पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्याने सनाचा पती मौलाना मुफ्ती अनस कोण आहे? असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.(फोटो इन्स्टाग्राम)

सनाचा पती मौलाना मुफ्ती अनस मुळचा सुरत येथील गुजरातचा रहिवासी आहे. तो धर्मगुरू आणि व्यापारी आहे. (फोटो इन्स्टाग्राम)

सना खान ही अभिनेत्री बिग बॉस 6 दरम्यान चर्चेत आली होती. 2005 मध्ये 'यही है हाय सोसायटी' या चित्रपटातून तिने अभिनयाची कारकिर्द सुरु केली होती. (फोटो इन्स्टाग्राम)

यानंतर हिंदी, मल्याळम, तामिळ, तेलगू, कन्नड अशा भाषेतील अनेक सिनेमे तिने केलेत. बिग बॉस आणि फिअर फॅक्टर या रिअॅलिटी शोमध्ये सुद्धा ती झळकली होती. (फोटो इन्स्टाग्राम)