'तुझ्यात जीव रंगला' फेम वहिनीसाहेबांचा नादखुळा!, धनश्री काडगावकर लेहंग्यातील अदांवर चाहते झाले फिदा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2022 03:22 PM2022-03-19T15:22:34+5:302022-03-19T15:31:24+5:30

Dhanashree Kadgaonkar: प्रेग्नेंसीनंतर धनश्री काडगावकरचे झालेले ट्रान्सफॉर्मेशन पाहून चाहते इंप्रेस झाले आहेत.

अभिनेत्री धनश्री कडगावकर तिच्या प्रेग्नंसीदरम्यानही सोशल मीडियावर सक्रीय होती.

बाळाच्या जन्मानंतरही ती चाहत्यांच्या संपर्कात होती. बाळाच्या जन्मानंतर तिचे वजनही वाढले होते.

त्यानंतर आता तिने तिचे वजन घटविले आहे.

आता पुन्हा एकदा धनश्री पूर्वीसारखीच ग्लॅमरस लूक दिसू लागली आहे.

नित्यनियमाने ती वर्कआऊट, योग्य डाएट करत तिने आपलेले वाढलेले वजनही कमी केल्याचे पाहायला मिळतंय.

धनश्रीचे ट्रान्सफॉर्मेशन पाहून चाहते हैराण झाले आहेत.

धनश्रीने नुकतेच लेहंग्यात फोटोशूट केले असून यात ती खूपच ग्लॅमरस दिसते आहे.

धनश्रीच्या लेहंग्यातील फोटोंना चाहत्यांची खूपच पसंती मिळते आहे.