तितीक्षाच्या लग्नात मित्रमैत्रिणींची धमाल; पाहा लग्नातील Inside photos

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2024 04:07 PM2024-02-26T16:07:21+5:302024-02-26T16:20:48+5:30

Titeeksha and siddharth: तितीक्षा आणि सिद्धार्थ यांच्या जवळच्या मित्र-मैत्रिणींनी त्यांच्या लग्नातील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. विशेष म्हणजे हे फोटो क्षणार्थात व्हायरल झाले.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे तितीक्षा तावडे हिने नुकतीच लग्नगाठ बांधली आहे.

तितीक्षाने अभिनेता सिद्धार्थ बोडके याच्यासोबत लग्नगाठ बांधली असून सध्या सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाचे फोटो व्हायरल होत आहेत.

मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत तितीक्षाने मोठ्या धुमधडाक्यात लग्नगाठ बांधली. यावेळी त्यांच्या मराठमोळ्या लूकने सगळ्याचं लक्ष वेधून घेतलं होतं.

तितीक्षाने गोल्डन शेड असलेली साडी नेसली होती. तर, सिद्धार्थनेही तिला मॅच होईस असा कुर्ता आणि धोतर नेसलं होतं.

तितीक्षा-सिद्धार्थच्या जवळच्या मैत्रिणीने त्यांच्या लग्नातील हे खास क्षण चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.

या लग्नात ऐश्वर्या नारकर यांच्यापासून ते रसिका सुनीलपर्यंत अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. विशेष म्हणजे या लग्नात मित्रमंडळींनी चांगलीच धमाल केल्याचं दिसून येत आहे.

रविवारी सिद्धार्थ आणि तितीक्षाचा साखरपुडा पार पडला. त्यानंतर त्यांच्या हळदीचे फोटो व्हायरल झाले होते.

केळवणाचा फोटो शेअर करत तितीक्षा आणि सिद्धार्थने लग्न करणार असल्याची बातमी दिली होती.

तितीक्षा आणि सिद्धार्थने 'तू अशी जवळी राहा' मालिकेत एकत्र काम केलं होतं. सध्या तितीक्षा 'सातव्या मुलीची सातवी गोष्ट' मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.

सिद्धार्थने मराठीबरोबरच हिंदी मालिकांमध्येही काम केलं आहे. अजय देवगणच्या 'दृश्यम २' या सिनेमातही तो झळकला होता.