‘द कपिल शर्मा शो’ फेम अभिनेत्रीच्या मॅटर्निटी फोटोशूटची चर्चा, शर्टलेस पतीबरोबर दिल्या खास पोज

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2023 05:57 PM2023-09-09T17:57:37+5:302023-09-09T18:09:37+5:30

टीव्ही अभिनेत्रीच्या मॅटर्निटी फोटोशूटची चर्चा, फोटो सोशल मीडियावर व्हायरल

‘द कपिल शर्मा शो’ हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम आहे. या शोमधून अभिनेत्री रोशेल राव घराघरात पोहोचली. रोशलने काही दिवसांपूर्वीच मॅटर्निटी फोटोशूटचे फोटो शेअर करत गरोदर असल्याची गूडन्यूज दिली होती. आता पुन्हा तिने मॅटर्निटी फोटोशूट केलं आहे.

रोशेल तिच्या प्रेग्नेंसीचा काळ एन्जॉय करताना दिसत आहे. तिने पती कीथ सिकेरासह मॅटर्निटी फोटोशूट केलं आहे. या फोटोशूटसाठी तिने खास पोझ दिल्या आहेत. रोशेलचं हे मॅटर्निटी फोटोशूट सोशल मीडियावर चर्चेत आहे.

रोशेलचा पती या फोटोंमध्ये शर्टलेस झाल्याचं पाहायला मिळत आहे. तर रोशेलने फोटोशूटसाठी खास हिरव्या रंगाचा गाऊन परिधान केला आहे. या फोटोमध्ये रोशेलने हटक्या पोझही दिल्या आहेत.

फोटोमध्ये रोशेलच्या चेहऱ्यावर प्रेग्नंन्सीचा ग्लो स्पष्ट दिसत आहे. रोशेलने फोटोशूटमध्ये तिचं बेबी बंपही फ्लाँट केलं आहे. तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडूनही लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.

२०१८मध्ये रोशेल आणि सिकेराने लग्नगाठ बांधली होती. लग्नाच्या पाच वर्षांनी आता ते आईबाबा होणार आहेत. रोशेल आणि सिकेराच्या आयुष्यात आता नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. यासाठी ते दोघेही उत्सुक आहेत.

काही दिवसांपूर्वीच रोशेलच्या बेबी शॉवरचा कार्यक्रम पार पडला. फोटो शेअर करत अभिनेत्रीने तिच्या बेबी शॉवर कार्यक्रमाची झलक दाखवली होती.