Photos: आई इतकीच सुंदर दिसते सुलेखा तळवलकरांची लेक! या क्षेत्रात करतेय काम, तुम्ही पाहिलंत का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2026 11:55 IST2026-04-27T11:50:32+5:302026-04-27T11:55:09+5:30

सुलेखा तळवलकरांची लेक टिया तळवळकरही त्यांच्याइतकीच सुंदर दिसते. पण टियाने आई सारखी अभिनयाची वाट धरलेली नाही.

सुलेखा तळवलकर या मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. वयाची पन्नाशी पार केली तरी अजूनही सुलेखा तळवळकर तितक्याच सुंदर दिसतात.

सुलेखा तळवलकर यांनी अभिनेत्री स्मिता तळवलकर यांचा लेक अंबर तळवलकर यांच्याशी लग्न केलं. त्यांना टिया ही मुलगी आणि आर्य हा मुलगा आहे.

सुलेखा तळवलकरांची लेक टिया तळवळकरही त्यांच्याइतकीच सुंदर दिसते. पण टियाने आई सारखी अभिनयाची वाट धरलेली नाही.

टियाने २०२१ मध्ये मिस दादर ही स्पर्धा जिंकली होती. तेव्हा ती कलाविश्वात पदार्पण करेल असं सगळ्यांना वाटलं होतं. मात्र टियाने करिअरसाठी वेगळा मार्ग निवडला.

टियाने हॉटेल मॅनेजमेंटमध्ये पदवी घेतली आहे. लहानपणापासूनच जेवण बनवणे, लोकांना खाऊ घालण्याची आवड असल्याचं टियाने म्हटलं होतं.

सुलेखा तळवलकर अनेकदा लेक आणि कुटुंबीयांसोबतचे फोटो शेअर करत असतात.

टिया सोशल मीडियावर फारशी सक्रिय नसल्याचं दिसतं. काही फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

सध्या सुलेखा तळवलकर या 'सावळ्याची जणू सावली' मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. या मालिकेत त्या तिलोत्तमाच्या भूमिकेत आहेत.