'रंग माझा वेगळा' मालिकेत साधी सोज्वळ दिसणारी दीपा पाहा प्रत्यक्षात कशी दिसते, See Photos

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2023 04:02 PM2023-04-27T16:02:39+5:302023-04-27T16:07:01+5:30

Rang Maza Vegla Fame Reshma Shinde : 'रंग माझा वेगळा' या मालिकेत दीपाची भूमिका अभिनेत्री रेश्मा शिंदे हिने साकारली आहे.

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका रंग माझा वेगळाने कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील सर्वच पात्रांना प्रेक्षकांची पसंती मिळते आहे.

रंग माझा वेगळा मालिकेतील कलाकारांबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. या मालिकेत दीपाची भूमिका अभिनेत्री रेश्मा शिंदे हिने साकारली आहे.

रेश्मा शिंदे सोशल मीडियावर सक्रीय असून ती फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.

नुकतेच रेश्माने इंस्टाग्रामवरील फोटोतून नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

या फोटोत रेश्मा शिंदे खूपच ग्लॅमरस दिसते आहे.

रेश्मा शिंदे मराठी टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने बऱ्याच मालिकेत काम केले आहे.

रंग माझा वेगळा मालिकेत तिने साकारलेल्या दीपाच्या भूमिकेला प्रेक्षकांची खूप पसंती मिळते आहे.

याशिवाय तिने नांदा सौख्यभरे, चाहूल या मालिकेत काम केले आहे.

याशिवाय रेश्माने हिंदी मालिकेतही काम केले आहे.

रेश्माने 'केसरी नंदन' या हिंदी मालिकेत प्रमुख भूमिका साकारली होती. 'लालबागची राणी' या चित्रपटातही ती झळकली.