पोपटलालचं लग्नच होईना! खऱ्या आयुष्यात मात्र सुंदर बायको अन् तीन मुलांचा बाप आहे अभिनेता

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2026 11:50 IST2026-04-25T11:25:25+5:302026-04-25T11:50:52+5:30

अभिनेत्याचं लग्न कधी झालं माहितीये का?

'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिका गेल्या १६ वर्षांपासून प्रेक्षकांचं अविरत मनोरंजन करत आहे. या मालिकेतील प्रत्येक कॅरेक्टर गाजलं आहे.

जेठालाल, भिडे, हाथी भाई, मेहता साहाब, दयाभाभी, अंजली, सोढी, टप्पू गँग सगळ्यांनाच कमालीची लोकप्रियता मिळाली.

या सगळ्यांमध्ये पोपटलाल या भूमिकेलाही विशेष ओळख मिळाली. 'दुनिया हिला दुँगा' म्हणणारा पोपटलाल ज्याचं कितीतरी वर्षांपासून लग्नच ठरत नसतं.

पण खऱ्या आयुष्यात पोपटलाल म्हणजेच अभिनेता श्याम पाठकने त्याच्या कॉलेजमधल्या मुलीशी लग्न केलं. दोघांना तीन मुलंही आहेत. कोण आहे श्यामची पत्नी?

२००३ साली श्याम पाठकने रश्मी या मुलीशी लग्न केलं. तारक मेहता मालिका सुरु होण्याआधीच त्याचं लग्न झालेलं होतं. श्यामने एनएसडीमधून शिक्षण घेतलं. तिथेच त्याची रश्मीशी ओळख झाली.

श्यामचे पत्नी आणि मुलांसोबतचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्याला एक मुलगी आणि दोन मुलं आहेत.

श्याम पाठक कुटुंबासोबत व्हेकेशनसाठी जातो. अनेक चाहते त्याच्यासोबत फोटो काढायला येतात. असेच त्याच्या व्हेकेशनचेही काही फोटो सोशल मीडियावर आहेत.

मराठी लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता चिन्मय मांडलेकर हा श्याम पाठकचा एनएसडीमधला क्लासमेट होता. श्यामने कॉलेजमधल्या सर्वात सुंदर मुलीला पटवून तिच्याशी लग्न केलं असं चिन्मयने एका मुलाखतीत सांगितलं होतं.