Photos: पुन्हा एकदा शनाया चर्चेत; ग्लॅमरस फोटोशूट करत वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2021 10:45 AM2021-12-15T10:45:00+5:302021-12-15T10:45:00+5:30

Rasika sunil: छोट्या पडद्यावरील 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे रसिका सुनील.

छोट्या पडद्यावरील 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे रसिका सुनील (rasika sunil).

'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेत रसिकाने शनाया ही भूमिका साकारली होती. विशेष म्हणजे या भूमिकेमुळे ती तुफान लोकप्रिय झाली.

रसिका सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असून तिच्याविषयी प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात.

काही दिवसांपूर्वीच रसिका विवाहबंधनात अडकली असून तिने आदित्य बिलागीसोबत लग्नगाठ बांधली आहे.

सध्या रसिका तिचा हनीमून पिरिअड एन्जॉय करत आहे. या व्हेकेशनमधील अनेक फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

रसिकाने अलिकडेच इन्स्टाग्रामवर तिचे काही बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत.

रसिकाने लाल रंगाच्या वनपीस गाऊनमध्ये हे फोटोशूट केलं आहे.

काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये रसिका सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.