फोटोतील चिमुकलीला ओळखलंत का? तरुणांची क्रश; मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2026 15:53 IST2026-04-22T15:40:05+5:302026-04-22T15:53:04+5:30

अभिनेत्रीचा आजही तोच क्युटनेस, एका स्माईलवर अख्खा महाराष्ट्र होतो फिदा!

आपल्या लाडक्या कलाकारांचे लहानपणीचे फोटो अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यात त्यांना ओळखणंही शक्य होत नाही.

'महाराष्ट्राची क्रश' म्हणून प्रसिद्धीझोतात आलेल्या या अभिनेत्रीचा हा बालपणीचा फोटो व्हायरल झाला. यामध्ये तिचा क्युटनेस, गोंडस अंदाज प्रेमात पाडणारा आहे.

अभिनेत्रीने शेअर केलेल्या बालपणीच्या फोटोमध्ये ती तिच्या भावाबरोबर पूजेसाठी बसली आहे. निळ्या आणि पांढऱ्या रंगाचा सुंदर ड्रेस घालून आणि देवासमोर हात जोडून या चिमुकलीने फोटोसाठी पोज दिल्याचं या फोटोमध्ये पाहायला मिळत आहे.

आता प्रत्येकाला ही अभिनेत्री नेमकी कोण आहे असा प्रश्न पडला आहे. तर ही आहे सर्वांची लाडकी प्राजक्ता माळी.

'जुळून येती रेशीमगाठी'मालिकेतून प्राजक्ता प्रसिद्धीझोतात आली. नंतर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' मध्ये तिचं अफलातून सूत्रसंचालन व्हायरल झालं.

प्राजक्ताने अनेक मराठी सिनेमांमध्येही भूमिका साकारल्या. 'फुलवंती' सिनेमातून तिने निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवलं आणि हा सिनेमा सुपरहिट करुन दाखवला.

याशिवाय 'रानबाजार'सारख्या बोल्ड विषयावरील सीरिजमध्येही तिने काम केलं. तिच्या वैविध्यपूर्ण अभिनयाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.

आज प्राजक्ता अभिनेत्रीच नाही तर बिझनेसवुमनही आहे. तिच्या सौंदर्यावर अख्खा महाराष्ट्र फिदा आहे.