३७ व्या वर्षी विदेशी बॉयफ्रेंडसोबत मराठी अभिनेत्रीने संसार थाटलाय; दीड वर्ष कोणालाच सांगितलं नाही

By देवेंद्र जाधव | Updated: April 16, 2026 12:25 IST2026-04-16T12:13:28+5:302026-04-16T12:25:44+5:30

एकेकळी अफेअर गाजलं नंतर ब्रेकअप झालं. पुढे ३७ व्या वर्षी परदेशी बॉयफ्रेंडसोबत अभिनेत्रीने संसार थाटला. कोण आहे ती मराठी अभिनेत्री?

एकेकळी अफेअर गाजलं नंतर ब्रेकअप झालं. पुढे ३७ व्या वर्षी परदेशी बॉयफ्रेंडसोबत अभिनेत्रीने संसार थाटला. ती अभिनेत्री आहे 'पक पक पकाक' फेम नारायणी शास्त्री.

नारायणीने 'क्यूंकी सास भी कभी बहू थी' आणि 'पिया का घर' यांसारख्या मालिकांमधून घराघरात ओळख निर्माण केली. नारायणी शास्त्री आणि अभिनेता गौरव चोप्रा यांच्या अफेअरची एकेकाळी खूप चर्चा होती. हे दोघे बराच काळ एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये होते.

मात्र, काही काळानंतर नारायणी आणि गौरव या दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला आणि त्यांचे ब्रेकअप झाले. विशेष म्हणजे, ब्रेकअपनंतरही त्यांनी एकमेकांचा द्वेष केला नाही; आजही ते एकमेकांचे चांगले मित्र आहेत.

पुढे नारायणीने तिचा परदेशी बॉयफ्रेंड स्टीव्हन ग्रेव्हरसोबत लग्न केलं. हे लग्न अत्यंत साध्या पद्धतीने झाले होते आणि जवळपास दीड वर्षांनंतर तिने आपण विवाहित असल्याचे जाहीर करून सर्वांना चकित केले होते.

नारायणीच्या मते, तिला तिचे वैयक्तिक आयुष्य खाजगी ठेवायला आवडते, म्हणूनच तिने लग्नाचा गाजावाजा केला नव्हता. म्हणूनची तिने लग्नाची इतकी मोठी बातमी सर्वांपासून लपवून ठेवली.

नारायणी शास्त्री नेहमीच तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. तिने टेलिव्हिजनवर अनेक आव्हानात्मक भूमिका साकारल्या आहेत. ग्लॅमरस दुनियेत असूनही ती प्रसिद्धीपासून दूर राहणे पसंत करते.

नारायणीला पक पक पकाक चित्रपटातील साळूच्या भूमिकेतून खूप प्रसिद्धी मिळाली. नारायणी या मराठी सिनेमानंतर हिंदी टीव्ही इंडस्ट्रीत स्थिरावली. आज ती हिंदीतील लोकप्रिय अभिनेत्री मानली जाते.