नवरा प्रसिद्ध कलाकार असूनही समीर चौगुलेची पत्नी राहते अत्यंत साधी; पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2022 02:21 PM2022-05-19T14:21:46+5:302022-05-19T14:35:04+5:30

Sameer chougule:अलिकडेच समीरच्या पत्नीचा वाढदिवस झाला. यावेळी त्याने आपल्या बायकोसाठी खास पोस्ट लिहिली.

उत्तम अभिनय आणि आपल्या विनोदाने प्रेक्षकांना खळखळून हसायला लावणारा अभिनेता म्हणजे समीर चौगुले.

विनोदवीर असण्यासोबतच समीर चौगुले एक गुणी लेखकदेखील आहे. त्यामुळे अनेकदा तो त्याचे स्किट स्वत:चं लिहित असतो.

कलाविश्वाप्रमाणेच समीर सोशल मीडियावरही कमालीचा सक्रीय आहे. त्यामुळे अनेकदा तो त्याच्या अपकमिंग प्रोजेक्ट वा अन्य गोष्टींची माहिती नेटकऱ्यांना देत असतो.

समीर फार कमी वेळा त्याच्या कुटुंबासोबतचे फोटो शेअर करतो. मात्र, यावेळी त्याने त्याच्या पत्नीचा फोटो शेअर करत नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

"happy birthday to my heart बायको....आयुष्याच्या मार्गावर प्रवास करताना "थांब... पुढे धोक्याचे वळण आहे"..."पुढे अपघाती क्षेत्र आहे" .."वेग कमी कर" हे सातत्याने सांगत आलीस.... मी तुला काय देऊ .सगळं तूच तर दिलंयस मला .आसमंतात मावणार नाही इतकं प्रेम मात्र मी देऊ शकतो....happy birthday and a big thank you for coming in my life", असं कॅप्शन देत त्याने पत्नीसोबतचा एक फोटो शेअर केला.

समीरच्या पत्नीचं नाव कविता चौगुले असं असून त्या कलाविश्वापासून दूर आहेत.

कविता यांचा सोशल मीडियावरील वावर कमी आहे. तसंच त्या खऱ्या आयुष्यातही प्रचंड साधेपणाने राहतात.

कविता आणि समीर या जोडीकडे पाहिलं की साधी राहणी उच्चविचारसरणी या युक्तीची प्रचिती येते.