PHOTOS : 'क्योंकि सास भी कभी बहू थी' मधील गौतम विरानी आठवतोय? आता इतका बदलला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2023 03:05 PM2023-04-03T15:05:02+5:302023-04-03T15:22:04+5:30

Kyunkii Saas Bhi Kabhi Bahu Thi, Sumeet Sachdev : 'क्योंकि सास भी कभी बहू थी' या लोकप्रिय मालिकेतील गोमजी उर्फ गौतम विरानी तुम्हाला आठवत असेलच. आता त्याला ओळखणंही कठीण झालंय...

Sumeet Sachdev : 'क्योंकि सास भी कभी बहू थी' या लोकप्रिय मालिकेतील गोमजी अर्थात गौतम विरानी तुम्हाला आठवत असेलच. आता त्याला ओळखणंही कठीण झालंय.

गोमजीची भूमिका अभिनेता सुमित सचदेवने साकारली होती. या भूमिकेनं त्याला एक वेगळी ओळख दिली.मात्र २०१८ पासून छोट्या पडद्यावरून तो जणू गायब झाला होता.

आता तब्बल पाच वर्षांनी तो छोट्या पडद्यावर परतला आहे. पण आताश: त्याचा लुक इतका बदललाये की, त्याला तुम्ही ओळखूही शकणार नाही.

चासनी या मालिकेतून त्याने छोट्या पडद्यावर कमबॅक केलं. या मालिकेसाठी सुमितने तब्बल १५ किलो वजन कमी केलं.

सुमितने नव्या लुकमधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्याचे हे फोटो पाहून हाच तो गोमजी यावर चाहत्यांचा विश्वास बसत नाहीये.

त्याने हेअर स्टाइल देखील बदलली आहे. केस वाढवले असून ते ब्लीच केले आहेत. तासन् तास जिममध्ये घाम गाळला.

चासनी या मालिकेत सुमित निगेटिव्ह भूमिकेत आहे. सुमेर बब्बर नावाची भूमिका तो साकारत आहे. ये है मोहब्बते या मालिकेत सुमित शेवटचा दिसला होता. त्यात त्यानं अभिमन्यु राघव उर्फ मणि ही भूमिका साकारली होती.

क्यों की सास भी कभी बहू थी, क्या हादसा क्या हकीकत, ख्याहिश, बंदिनी, प्यार का बंधन अशा अनेक मालिकेत त्याने काम केलंय.

लॉकडाऊनदरम्यान सगळं काही ठप्प झालं होतं. यावेळी त्याने आपलं युट्यूब चॅनल सुरू केलं होतं. बारीश बन जाना या म्युझिक व्हिडीओचं दिग्दर्शनही केलं होतं.

सुमित सचदेव हा दिल्लीचा आहे. खास म्हणजे, तो स्मृती इराणींचा क्लासमेट होता. क्यों की सांस भी कभी बहू थी मालिकेत स्मृती इराणींनी त्याच्या आईची भूमिका साकारली होती.