Indian Idol 12 फेम सायली कांबळेची दुबईत वाळवंट सफारी, दिसली पतीसोबत रोमँटिक अंदाजात

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2023 02:56 PM2023-01-20T14:56:53+5:302023-01-20T15:00:48+5:30

Indian Idol 12 Fame Sayali Kamble : 'इंडियन आयडॉल १२'ची प्रसिद्ध स्पर्धक सायली कांबळे सध्या दुबईत व्हॅकेशन एन्जॉय करते आहे.

सिंगिंग रिअॅलिटी शो 'इंडियन आयडॉल'ची प्रसिद्ध स्पर्धक सायली कांबळे सातत्याने चर्चेत येत असते.

सायली कांबळे हिने प्रियकर धवल पाटील याच्याशी लग्न केले. त्यांच्या लग्नाला जवळपास ८ महिने झाले आहेत.

बऱ्याचदा सायली आणि धवल सोशल मीडियावर त्यांचे फोटो शेअर करत असतात. त्यांच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते.

सायली कांबळे सध्या दुबईत व्हॅकेशन एन्जॉय करते आहे.

सायली कांबळे हिने इंस्टाग्रामवर दुबईतल्या वाळवंटात फेरफटका मारताना दिसते आहे.

या फोटोशूटमध्ये सायली कांबळे पती धवल पाटीलसोबत रोमँटिक मूडमध्ये दिसते आहे.

सायली कांबळेने २४ एप्रिल, २०२२ रोजी प्रियकर धवलसोबत लग्नाच्या आणाभाका घेतल्या.

महाराष्ट्रीय पद्धतीने अगदी थाटामाटात सायली आणि धवलचा लग्नसोहळा पार पडला होता.

या लग्न सोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ समोर आले होते.

सायली आणि धवल एकमेकांना खूप दिवसांपासून डेट करत होते. त्यांच्या लग्नाचे आणि त्यांच्याशी संबंधित विधींचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाले होते.