Indian Idol 12 फेम सायली कांबळेनं साजरी केली पहिली मकर संक्रांत, पतीसोबत दिसली रोमँटिक अंदाजात

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2023 03:01 PM2023-01-18T15:01:52+5:302023-01-18T15:10:36+5:30

Indian Idol 12 Fame Sayali Kamble : 'इंडियन आयडॉल १२'ची प्रसिद्ध स्पर्धक सायली कांबळे हिने सोशल मीडियावर पहिल्या मकर संक्रांतीचे फोटो शेअर केले आहेत.

सिंगिंग रिअॅलिटी शो 'इंडियन आयडॉल'ची प्रसिद्ध स्पर्धक सायली कांबळे सातत्याने चर्चेत येत असते.

सायली कांबळे हिने प्रियकर धवल पाटील याच्याशी लग्न केले. त्यांच्या लग्नाला जवळपास ८ महिने झाले आहेत.

बऱ्याचदा सायली आणि धवल सोशल मीडियावर त्यांचे फोटो शेअर करत असतात. त्यांच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते.

लग्नानंतर सायली कांबळे हिने पहिली मकरसंक्रांत साजरी केली.

यावेळी तिने काळ्या रंगाच्या साडीसोबत हलव्याचे दागिनेदेखील घातले होते. तिच्यासोबत धवलने देखील काळ्या रंगाचा कुर्ता आणि हलव्याचे दागिने घातलेले पाहायला मिळाले.

सायलीने पहिल्या मकरसंक्रांतीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

या फोटोत सायली आणि धवल रोमँटिक अंदाजात पाहायला मिळाले. त्यांच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.

सायली कांबळेने २४ एप्रिल, २०२२ रोजी प्रियकर धवलसोबत लग्नाच्या आणाभाका घेतल्या.

महाराष्ट्रीय पद्धतीने अगदी थाटामाटात सायली आणि धवलचा लग्नसोहळा पार पडला होता. या लग्न सोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ समोर आले होते.

सायली आणि धवल एकमेकांना खूप दिवसांपासून डेट करत होते. त्यांच्या लग्नाचे आणि त्यांच्याशी संबंधित विधींचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाले होते.

सायली कांबळेने ‘इंडियन आयडल १२’ संपल्यानंतर लगेचच सोशल मीडियावर आपल्या प्रेमाची कबुली देत, धवलसोबत आपल्या नात्याची अधीकृत घोषणा केली होती.