'तारक मेहता...' मालिकेसाठी बबीता आणि टप्पू किती मानधन घ्यायचे? माहीत आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2024 03:02 PM2024-03-14T15:02:23+5:302024-03-14T15:12:20+5:30

'तारक मेहता का उलटा चष्मा' मालिकेत काम करण्यासाठी मुनमुन दत्ता आणि राज अनादकट एका एपिसोडसाठी किती मानधन घ्यायचे हे तुम्हाला ठाऊक आहे का?

'तारक मेहता का उलटा चष्मा' फेम मुनमुन दत्ता आणि राज अनादकट यांनी साखरपुडा केल्याची बातमी समोर आली होती.

९ वर्षांनी छोट्या असलेल्या राजबरोबर मुनमुनने साखरपुडा केल्याने सगळेच आश्चर्यचकित झाले होते. पण, नंतर हे वृत्त खोटं असल्याचं समोर आलं होतं.

मुनमुन दत्ता आणि राज अनादकट 'तारक मेहता का उलटा चष्मा' या लोकप्रिय मालिकेतून घराघरात पोहोचले.

राज अनादकटने याबाबत सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही बातमी पूर्णपणे खोटी आणि अर्थहीन असल्याचं सांगितलं.

तर मुनमुनने प्रतिक्रिया देत "या गोष्टींवर मी माझी शक्ती वाया घालवणार नाही," असं म्हणाली.

या मालिकेत बबिता हे पात्र साकारून मुनमुन प्रसिद्धीझोतात आली. तर टप्पू हे पात्र साकारून राजने लोकप्रियता मिळवली.

पण 'तारक मेहता का उलटा चष्मा' मालिकेत काम करण्यासाठी मुनमुन दत्ता आणि राज अनादकट एका एपिसोडसाठी किती मानधन घ्यायचे हे तुम्हाला ठाऊक आहे का?

'तारक मेहता...'मधील मुनमुनने साकारलेलं बबिता हे पात्र खूपच लोकप्रिय झालं. अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये काम केलेल्या मुनमुनला या पात्राने लोकप्रियता मिळवून दिली.

'तारक मेहता'मध्ये बबीता हे पात्र साकारण्यासाठी मुनमुन तब्बल ५० ते ७५ हजार रुपये इतकं मानधन घ्यायची.

तर टप्पू या मालिकेच्या एका एपिसोडसाठी १०-२० हजार रुपये फी आकारायचा.