हिना खानच्या या फोटोंच्या प्रेमात पडलेत तिचे चाहते, पाहा तिचे हे स्टायलिश फोटो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2021 06:31 PM2021-01-30T18:31:43+5:302021-01-30T18:31:43+5:30

हिना खानने नुकतेच एक ग्लॅमरस फोटोशूट केले आहे.

हिना खानने या फोटोशूटमधील काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट करून त्यासोबत लिहिले आहे की, सध्या थंडी असून या हॉट फॅशनमुळे मला थंडी वाजणार नाही.

हिना खानचा या फोटोशूटमधील अंदाज तिच्या फॅन्सचा प्रचंड आवडत आहे.

हिनाने ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेद्वारे तिच्या अभिनयकारकिर्दीला सुरुवात केली.

हिना खान बिग बॉस या कार्यक्रमात देखील झळकली होती.

तसेच हिना खानने खतरों के खिलाडी या कार्यक्रमात जबरदस्त स्टंट करत सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता.

हिना लवकरच बॉलिवूडच्या चित्रपटामध्ये झळकणार आहे.

हिना खान नेहमीच सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. ती तिचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते.