'या' लोकप्रिय मराठी अभिनेत्रीला ओळखलंत का? 'ताली' सीरिजमध्ये साकारलेली भूमिका, आहे टीव्हीवरचा लोकप्रिय चेहरा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2026 16:15 IST2026-04-25T15:45:36+5:302026-04-25T16:15:00+5:30
निरागस चेहरा अन्...फोटोतील मराठी अभिनेत्रीला ओळखलंत का? 'ताली'मध्ये साकारली गौरी सावंत यांच्या बालपणीची भूमिका

लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनची मुख्य भूमिका असलेली ताली या वेब सीरिजची चांगलीच चर्चा झाली.

गौरी यांच्या आयुष्यावर आधारलेली ही सीरिज सध्या प्रचंड गाजतेय. या वेबसीरिजमध्ये अनेक मराठी कलाकारांनी आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे.

या वेबसीरिजमध्ये अनेक मराठी कलाकारही झळकले.

त्यातच गौरी सावंत यांच्या बालपणीची भूमिका साकारून एका मराठी अभिनेत्रीने सगळ्याचं लक्ष वेधून घेतलं होतं.ही अभिनेत्री म्हणजे कृतिका देव.

कृतिकाने या वेबसीरिजमध्ये गौरी सावंत यांचं बालपण साकारलं आहे. गौरी आधी गणेश असताना कशी होती? हे चित्र कृतिकाने आपल्या अभिनयातून उभं केलं आहे.तिच्या अभिनयाचं देखील प्रचंड कौतुक झालं.

अभिनेत्री कृतिका देवला आपण अनेक सिनेमांच्या माध्यमातून भेटलोय.'बकेट लिस्ट', 'अनया',' राजवाडे अँड सन्स' या सिनेमांमध्ये ती दिसली होती.

नुकतंच कृतिकाने 'स्टार प्रवाह'वर 'लपंडाव' या मालिकेतून मालिका विश्वात पदार्पण केलंय. या मालिकेत ती सखी नावाची मुख्य भूमिका साकारते आहे.

















