१० वर्ष लागली पण करुन दाखवलं! लोकप्रिय अभिनेत्याने मुंबईत खरेदी केलं हक्काचं घर, आई-वडिलांचे मानले आभार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2026 10:18 IST2026-05-15T09:52:47+5:302026-05-15T10:18:08+5:30

'बिग बॉस १८' मुळे घराघरात पोहोचलेला अभिनेत्याने मुंबईत स्वतःचे पहिले घर खरेदी करून आपल्या आयुष्यातील एक मोठा टप्पा गाठला आहे. सर्वांनी त्याचं अभिनंदन केलंय.

'बिग बॉस १८' मुळे घराघरात पोहोचलेला अभिनेता अविनाश मिश्रा याने मुंबईत स्वतःचे पहिले घर खरेदी करून आपल्या आयुष्यातील एक मोठा टप्पा गाठला आहे.

जवळपास १० वर्षांची सातत्यपूर्ण मेहनत, संयमानंतर हे स्वप्न पूर्ण झाल्याचे त्याने एका भावुक पोस्टद्वारे सांगितले आहे. त्याने आपल्या नवीन घराच्या 'गृहप्रवेश' पूजेचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

"अखेर... मुंबईत स्वतःचे घर! १० वर्षे लागली... पण आता मी अभिमानाने सांगू शकतो की आम्ही हे करून दाखवले, अशी पोस्ट अविनाशने लिहिली आहे.

''जेव्हा मी पहिल्यांदा मुंबईत आलो होतो, तेव्हा मनात अनेक प्रश्न होते—हे कसं होईल? मी या शहरात टिकू शकेन का? पण देवाने आपल्या आयुष्याची पटकथा योग्य वेळ आणि योग्य क्लायमॅक्ससह लिहिलेली असते. तुम्ही फक्त तुमचे काम प्रामाणिकपणे करत राहा, बाकी तो बघून घेईल.", असं अविनाशने सांगितलं.

अविनाशने आपल्या यशाचे श्रेय पालकांना देताना म्हटले की, "आई-वडिलांच्या प्रेमामुळे आणि पाठिंब्यामुळेच मी हे करू शकलो. माझ्या भावाचा आणि वहिनीचाही यात मोठा वाटा आहे, ज्यांनी नेहमी मला खंबीर पाठिंबा दिला. तसेच माझ्यावर प्रेम करणाऱ्या चाहत्यांचेही मनापासून आभार."

'बिग बॉस १८' मध्ये आपली छाप सोडल्यानंतर अविनाश आता रोहित शेट्टीच्या 'खतरों के खिलाडी १५' या स्टंट आधारित रिअॅलिटी शोमध्ये सहभागी होणार आहे.