टीव्ही अभिनेत्री असल्यामुळे चित्रपट मिळेना...! रिद्धी डोगरा म्हणे, आता मी थकले..!!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2021 05:31 PM2021-07-05T17:31:32+5:302021-07-05T17:43:02+5:30

रिद्धी डोगरा ही छोट्या पडद्यावरील एक नामांकित अभिनेत्री. पण टॅलेंट असूनही बॉलिवूडमध्ये संधी न मिळालेली....

रिद्धी डोगरा ही छोट्या पडद्यावरील एक नामांकित अभिनेत्री. पण टॅलेंट असूनही बॉलिवूडमध्ये संधी न मिळालेल्यांमध्येही तिचा समावेश होतो.

विविध मालिकांमधून तब्बल एक दशक प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी रिद्धी आजही कामाच्या शोधात आहे.बॉलिवूडमध्ये अद्यापही तिला संधी मिळालेली नाही.

आता रिद्धीने बॉलिवूडची पोलखोल केली आहे. टीव्ही कलाकार म्हटले की, दिग्दर्शक आणि निर्माते आम्हाला काम देत नाहीत. आम्ही टीव्ही कलाकारांना काम देत नाही,म्हणून अपमान करतात असा खळबळजनक आरोप तिने केला आहे.

टीव्ही कलाकारांना बॉलिवूडमध्ये निम्न दर्जाचे कलाकार समजले जाते. वारंवार आमचा टीव्ही कलाकार म्हणून अपमान केला जातो. मी अनेकदा बॉलिवूड चित्रपटांच्या आॅडिशनला गेले आहे. मात्र आॅडिशन पास करुनही काम मिळत नाही कारण आम्ही टीव्हीचे कलाकार आहोत, असे ती एका मुलाखतीत म्हणाली. आता हा अनुभव घेऊन मी थकले, असेही ती म्हणाली.

रिद्धीने 2007 साली झूमे जिया रे या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. त्यानंतर हिंदी है हम, हॉरर नाईट्स, सेव्हेन, ये है आशिकी, दिया और बाती हम यांसारख्या अनेक मालिकांमध्ये ती झळकली.

हिंदी है हम या मालिकेतून ती ख-या अर्थाने प्रकाशझोतात आली होती. मालिकेंसोबतच तिने झलक दिखलाजा, नच बलिये यांसारख्या रिअ‍ॅलिटी शोंमध्ये देखील भाग घेतला आहे.

अनेकांना ठाऊक नसेल पण रिद्धी ही दिवंगत माजी केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांची भाची आहे.अरूण जेटली यांच्या पत्नी रिद्धिची आत्या आहे.

रिद्धी अरुण जेटली यांच्या अनेक कौटुंबिक कार्यक्रमात त्यांच्या सोबत दिसायची. पण रिद्धीने कधीच याचा गवगवा केला नाही.