ऋतुजा बागवेचा हटके लूक; पाहा अभिनेत्रीच्या घायाळ करणाऱ्या अदा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2021 04:32 PM2021-05-24T16:32:32+5:302021-05-24T16:42:54+5:30

मराठी चित्रपटसृष्टी, रंगभूमी आणि मालिकांमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे ऋतुजा बागवे. ऋतुजाच्या अभिनयासह तिच्या ग्लॅमरस फोटोची ही वारंवार चर्चा होत असते.

काही महिन्यांपूर्वी ऋतुजाच्या सोशल मीडियावरील अशाच ग्लॅमरस फोटोंची खुमासदार चर्चा रंगली होती.

या प्रत्येक फोटोमध्ये ऋतुजाचा खास आणि हटके अंदाज पाहायला मिळाला होता.

आता पुन्हा एकदा ऋतुजाचा असाच एक ग्लॅमरस फोटो समोर आला आहे.

ऋतुजाचा ब्युटी इन ब्लॅक अंदाज कुणालाही घायाळ करणारा असाच म्हणावा लागेल.

पूर्णपणे ब्लॅक शेडमध्ये असलेले हे फोटो चाहत्यांच्या मनाचा ठाव घेणारे आहेत.

मोकळे सोडलेले केस, ब्लॅक ड्रेस असा अंदाज या फोटोत पाहायला मिळत आहे.

सोशल मीडियावर ऋतुजाचे हे फोटो सध्या सा-यांसाठी चर्चेचा विषय ठरले आहेत.

ऋतुजाचा ब्युटी, बोल्डनेस इन ब्लॅक अंदाज कॅमे-यात कैद झाला आहे.

याआधीसुद्धा ऋतुजाने असेच फोटोशूट केले होते.

या फोटोंनाही रसिकांची तितकीच पसंती मिळाली होती.