"पलाश मुच्छलला महिलेसोबत बेडवर रंगेहाथ पकडलं होतं, स्मृतीच्या मैत्रिणीने त्याला मारलं", कुणी केला गौप्यस्फोट?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2026 01:48 IST2026-01-24T01:41:44+5:302026-01-24T01:48:05+5:30
क्रिकेटर स्मृती मंधानासोबत लग्न मोडल्यानंतर पलाश मुच्छल वादात सापडला आहे. त्याच्याविरोधात आर्थिक फसवणूक केल्याची तक्रार दाखल झाली आहे. त्यातच आता एक धक्कादायक खुलासा वैभव माने याने केला आहे.

अभिनेता आणि निर्माता वैभव माने याने गायक पलाश मुच्छल याच्यावर खळबळजनक आरोप केले आहेत. पलाश मुच्छल याचे क्रिकेटर स्मृती मंधानासोबत लग्न ठरे होते. पण, अचानक लग्न मोडले. त्याबद्दल वेगवेगळ्या चर्चा झाल्या. मोडलेल्या लग्नाबद्दल वैभव माने याने गौप्यस्फोट केला आहे.

पलाश मुच्छलने ४० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप वैभव मानेने केला आहे. या प्रकरणी सांगली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

'एचटी सिटी'शी बोलताना वैभव मानेने सांगितले की, "मी लग्नाची तयारी (२३ नोव्हेंबर) सुरू असताना तिथे होतो. जेव्हा पलाश मुच्छलला एका दुसऱ्या महिलेसोबत बेडवर रंगेहाथ पकडण्यात आले, तिथेही मी होतो. धक्कादायक प्रसंग होता. भारतीय महिला क्रिकेटपटूंनी त्याला चोप दिला."

वैभव मानेने आरोप केला आहे की "जेव्हा मी गेल्या महिन्यात त्याच्या आईला (अमित मुच्छल) भेटलो, तर त्या म्हणाल्या की, चित्रपट रिलीज करण्याचे बजेट वाढून १.५कोटी रुपये झाले आहे. त्यांनी मला आणखी १० लाख रुपये गुंतवण्यास सांगितले. पैसे गुंतवले नाही, तर पैसे मिळणार नाही, असे म्हणत त्यांनी मला ब्लॅकमले करणे सुरू केले आणि चित्रपटातून काढून टाकेन अशी धमकीही दिली. त्यामुळे मला तक्रार करावी लागली.

वैभव मानेने दावा केला की, "अनेकदा प्रयत्न करूनही पलाश मुच्छलसोबत थेट संपर्क होऊ शकला नाही. लग्न मोडल्यानंतर त्याच्या कुटुंबाने मला प्रत्येक ठिकाणी ब्लॉक केले आहे. चित्रपटातील कलाकारांनाही पैसे दिले गेले नसल्याचे मला कळले आहे. ही पूर्णपणे चोरीच आहे."

"मुच्छल कुटुंबाकडून मला धमक्या मिळत आहेत. तुला चित्रपटातून काढून टाकू असे सांगितले जात आहे. माझ्याकडे सगळे पुरावे आहेत. माझ्याकडे चॅट्स आणि कॉलही आहेत. मी ते पोलीस आणि मीडियाला दाखवायला तयार आहे", असे मानेने सांगितले.

दरम्यान, पलाश मुच्छलने या आरोपांवर बोलताना म्हटले आहे की, सांगलीच्या वैभव मानेकडून चुकीचे आरोप करण्यात आले आहेत. मी स्पष्ट सांगू इच्छितो की, माझ्यावर केलेले आरोप पूर्णपणे निराधार आणि चुकीचे आहेत. माझी प्रतिमा मलीन करण्यासाठी हे केले गेले आहे. माझे वकील श्रेयांश मिथारे कायदेशीर मार्गाने चौकशी करत असून, योग्य कायदेशीर मार्गाने याला उत्तर दिले जाईल."

















