सेटवर मकरंद अनासपुरे पडले या अभिनेत्रीच्या प्रेमात, मग थाटला संसार; आता आहेत त्या कलाविश्वापासून दूर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2023 07:00 AM2023-03-06T07:00:00+5:302023-03-06T07:00:00+5:30

Makrand Anaspure Love Story : फार कमी लोकांना माहित नाही की मकरंद अनासपुरे यांची पत्नीदेखील अभिनेत्री आहेत. मात्र सध्या त्या सिनेइंडस्ट्रीत कार्यरत नाहीत.

अभिनेता मकरंद अनासपुरे (Makrand Anaspure) यांनी आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. त्यांनी मराठी चित्रपटासोबतच हिंदी चित्रपटातही काम केले आहे.

फार मोजक्या लोकांना माहित आहे की मकरंद अनासपुरेंची पत्नी शिल्पा अनासपुरे या देखील अभिनेत्री आहेत. मात्र सध्या त्या कलाविश्वात कार्यरत नाहीत.

मकरंद अनासपुरे आणि शिल्पा यांचा प्रेम विवाह आहे. शिल्पा मुळच्या मुंबईच्या आहेत आणि त्यांनी नाटक व चित्रपटात काम केले आहे. २००० साली 'जाऊ बाई जोरात' या नाटकात काम करत असताना पहिल्यांदा त्या दोघांची भेट झाली होती.

या नाटकात काम करता करता मकरंद यांचे शिल्पा यांच्यावर प्रेम जडले आणि त्यांनी शिल्पा यांना लग्नाची मागणी घातली.

शिल्पा यांनी लग्नासाठी होकार दिल्यानंतर त्यांनी त्यांच्या घरी याबद्दल सांगितले. विशेष बाब म्हणजे दोघांचे हे इंटरकास्ट मॅरेज आहे. पण दोघांच्या घरातून विरोध झाला नाही. ३० नोव्हेंबर २००१ रोजी औरंगाबादमध्ये ते दोघे विवाह बंधनात अडकले.

लग्नानंतर शिल्पा यांनी काही सिनेमात मकरंद अनासपुरे यांच्यासोबत काम केले. त्या दोघांनी जवळपास ५ सिनेमात एकत्र काम केले.

कापूस कोंड्याची गोष्ट, तुक्या तुकविला नाग्या नाचविला, सुंबरान, गोष्ट छोटी डोंगरा एवढी या सिनेमात ते एकत्र झळकले आहेत.

मकरंद अनासपुरे आणि नाना पाटेकर यांच्या नाम फाउंडेशनच्या कार्यातदेखील शिल्पा यांचा मोलाचा वाटा आहे.

मकरंद आणि शिल्पा अनासपुरे यांना दोन मुले आहेत.