'गुलाबी साडी'वर सर्वांना थिरकायला लावणारी प्राजक्ता घाग खऱ्या आयुष्यात आहे खूप ग्लॅमरस
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2024 18:41 IST2024-08-20T18:35:25+5:302024-08-20T18:41:58+5:30
Prajakta Ghag : 'गुलाबी साडी' हे गाणे संजू राठोड आणि प्राजक्ता घागवर चित्रीत करण्यात आले आहे. या गाण्यातून प्राजक्ता घाग घराघरात पोहचली.

संजू राठोडच्या गुलाबी साडी गाण्याने केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात धुमाकूळ घातला आहे.
गुलाबी साडी या गाण्यावर बॉलिवूडच्या धकधक गर्ल माधुरी दीक्षितपासून ते अगदी आफ्रिकेच्या किली पॉलपर्यंत बरेच जण थिरकताना दिसले.
गुलाबी साडी हे गाणे संजू राठोड आणि प्राजक्ता घागवर चित्रीत करण्यात आले आहे.
या गाण्यातून प्राजक्ता घाग घराघरात पोहचली.
प्राजक्ता घाग हिने नऊवारी पाहिजे आणि डिंपल या गाण्यात काम केलंय.
प्राजक्ता घाग सोशल मीडियावर सक्रीय असून ती फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते.
प्राजक्ता घाग खऱ्या आयुष्यात खूप ग्लॅमरस आहे.
सोशल मीडियावर प्राजक्ताने बरेच ग्लॅमरस लूकमधील फोटो शेअर केले आहेत.
प्राजक्ताच्या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते.
प्राजक्ता घागचे इंस्टाग्रामवर चांगले फॅन फॉलोव्हिंग आहे.