चंद्राच्या घायाळ करणाऱ्या अदा; निळ्या रंगाच्या साडीत अमृताचं सुरेख फोटोशूट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2024 02:43 PM2024-05-01T14:43:17+5:302024-05-01T14:47:04+5:30

Amruta khanvilkar: या फोटोंमध्ये अमृताने हलकासा मेकअप केला आहे. सोबतच मोकळे केस सोडले होते.त्यामुळे ती कमालीची सुंदर दिसत आहे.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकर. मराठी इंडस्ट्रीची चंद्रा म्हणूनही ती ओळखली जाते.

उत्तम अभिनयासह नृत्यकौशल्यामुळेही अमृता कायम चर्चेत असते.

सोशल मीडियावर तिचा प्रचंड वावर आहे. त्यामुळे ती कायम नेटकऱ्यांच्या संपर्कात येत असते.

अमृता कायम तिच्या ग्लॅमरस लूक, बेधडकपणा यामुळे चर्चेत येत असते. सध्या असेच तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

अमृताने नुकतंच एक फोटोशूट केलं आहे. निळ्या रंगाच्या साडीत तिने हे फोटोशूट केलं आहे.

या फोटोंमध्ये अमृताने हलकासा मेकअप केला आहे. सोबतच मोकळे केस सोडले होते.त्यामुळे ती कमालीची सुंदर दिसत आहे.

अमृताने मराठीसह बॉलिवूडमध्येही तिचं स्थान भक्कम केलं आहे. राझी, मलंग, सत्यमेव जयते यांसारख्या बॉलिवूड सिनेमांमध्येही ती झळकली आहे.