"तू बिकीनी घाल, मला तुला 'तसं' पाहायचंय..."; दिग्दर्शकाने अभिनेत्रीकडे केलेली विचित्र मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2026 11:32 IST2026-05-01T10:52:52+5:302026-05-01T11:32:08+5:30
Madalasa Sharma: बॉलिवूडमधील अभिनेत्रींना कास्टिंग काऊचचा सामना करावा लागल्याच्या अधुनमधून उघडकीस येत असतात. आता अभिनेत्री मदालसा शर्मा हिने तिला आलेल्या कास्टिंग काऊचच्या धक्कादायक अनुभवाबाबत माहिती दिली आहे. एका प्रसिद्ध फिल्ममेकरने आपल्या बिकिनी परिधान करण्यास सांगितले होते, असे मदालसा हिने सांगितले.

बॉलिवूडमधील अभिनेत्रींना कास्टिंग काऊचचा सामना करावा लागल्याच्या अधुनमधून उघडकीस येत असतात. आता अभिनेत्री मदालसा शर्मा हिने तिला आलेल्या कास्टिंग काऊचच्या धक्कादायक अनुभवाबाबत माहिती दिली आहे. एका प्रसिद्ध फिल्ममेकरने आपल्या बिकिनी परिधान करण्यास सांगितले होते, असे मदालसा हिने सांगितले.

Hauterrfly च्या पॉडकास्टमध्ये मदालसा शर्मा हिने सांगितले की, एका प्रसिद्ध दिग्दर्शकाने मला चित्रपटाच्या मिटिंगसाठी बोलावले होते. तेव्हा त्याने मला त्याच्यासमोर बिकिनी परिधान करण्यास सांगितले होते.

मदालसा म्हणाली की, तेव्हा मी १९ वर्षांची होते. मी तिथे गेल्यावर तो दिग्दर्शक म्हणाला की, मी अशा तरुणीचा शोध घेत आहे जी बिकिनी परिधान करण्यास कम्फर्टेबल असेल.

मला वाटलं बिकिनी परिधान करणं ही काही मोठी बाब नाही. त्यामुळे मी चालेल असं सांगितलं. मात्र मी आधी स्टोरी जाणून घेऊ इच्छिते. बिकिनी परिधान करणं हा कथानकाचा भाग आहे की त्यात काही वेगळा अँगल आहे, हे मला पाहायचं आहे, असेही त्याला सांगितले.

तेव्हा तो दिग्दर्शक म्हणाला की, तू बिकिनी परिधान करू शकतेस का? हे मला पाहायचं आहे. मला तुझी बॉडी लँग्वेज पाहायची आहे. बिकिनी परिधान करून तू कॅमेऱ्यासमोर कम्फर्टेबल राहू शकशील का, हे मला पाहायचं आहे.

त्यानंतर मी त्या दिग्दर्शकास सांगितले की, सॉरी, मी एक व्यावसायिक अभिनेत्री आहे. तसेच जर कथानकामध्ये बिकिनी सीनची आवश्यकता असेल किंवा साडीची आवश्यकता असेल, जे असेल ते मी परिधान करेन आणि कम्फर्टेबल राहीन, कारण हा माझ्या कामाचा भाग आहे. मात्र तुमच्यासमोर बिकिनी परिधान करणे हा माझ्या कामाचा भाग नाही. त्यामुळे माझं टॅलेंट पाहून माझी निवड करायची तर करा, नाहीतर दरवाजा कुठे आहे हे मला माहिती आहे.

मी एवढं सांगून तिथून निघून गेले. तो दिग्दर्शक काय विचार करेल, याची पर्वा मी केली नाही. काही दिवसानंतर तो दिग्दर्शक ती भूमिका करत असलेल्या अभिनेत्रीला डेट करत होता, असे मला समजले, असे मदालसा हिने सांगितले.

मदालसा शर्मा हिला अनुपमामधील काव्याच्या भूमिकेमुळे प्रसिद्धी मिळाली होती. तसेच तिने २०१८ साली मिथुन चक्रवर्तींचा मुलगा महाक्षय ऊर्फ मिमोह चक्रवर्तीसोबत लग्न केलं होतं. सध्या हे दोघेही आनंदाने संसार करत आहेत.

















