लक्ष्मीकांत बेर्डेंच्या लेकीचा नादखुळा! बोल्ड फोटोंनी चाहत्यांना केलं क्लीन बोल्ड

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2024 04:49 PM2024-02-17T16:49:14+5:302024-02-17T16:55:24+5:30

Laxmikant Berde's Daughter Swanandi Berde: अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे आणि अभिनेत्री प्रिया बेर्डे यांची लेक स्वानंदी बेर्डेचे सोशल मीडियावरील फोटो चर्चेत आले आहेत.

मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे आणि अभिनेत्री प्रिया बेर्डे यांची लेक स्वानंदी बेर्डे सोशल मीडियावर बरीच सक्रिय आहे.

स्वानंदी बेर्डे बऱ्याचदा सोशल मीडियावर फोटो शेअर करत असते आणि या फोटोंमुळे ती चर्चेत येत असते.

दरम्यान नुकतेच आता स्वानंदीने बोल्ड फोटोशूट केले आहे आणि या फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

या फोटोशूटमध्ये तिने व्हाइट रंगाचा डीप नेकचा ड्रेस घातला आहे.

स्वानंदी बेर्डेने या फोटोशूटमध्ये वेगवेगळ्या पोझ दिल्या आहेत.

स्वानंदीच्या या फोटोशूटला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.

लक्ष्मीकांत बेर्डे यांनीदेखील नाट्य क्षेत्रातूनच सिनेकारकीर्दीला सुरूवात केली होती. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत स्वानंदीदेखील नाटकातून आपल्या कारकीर्दीची सुरूवात केली आहे.

धनंजय माने इथंच राहतात या नाटकातून स्वानंदीने रंगभूमीवर एन्ट्री केली. तसेच स्वानंदीचा रिस्पेक्ट हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला.