ऐश्वर्या रायला टाकलं मागे! ७ अब्जांची मालकीण असलेली 'ही' अभिनेत्री ठरली २०२६ ची जगातील सर्वात सुंदर महिला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2026 11:50 IST2026-04-22T11:39:02+5:302026-04-22T11:50:11+5:30

सौंदर्य हे केवळ वयावर अवलंबून नसतं, तर ते तुमच्या व्यक्तिमत्वातून आणि कामातून झळकत असतं. याचाच प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे.

सौंदर्याची व्याख्या काळानुसार बदलत असली, तरी काही चेहरे मात्र काळावर मात करतात. २०२६ मध्ये जगातील सर्वात सुंदर महिलेचा किताब कोणाला मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

अनेक वर्षांपासून 'जगातील सर्वात सुंदर महिला' या यादीत ऐश्वर्या राय बच्चनचे नाव अग्रक्रमाने घेतले जात असे.

मात्र, २०२६ च्या नवीन सर्वेक्षणानुसार आणि 'पीपल'च्या ताज्या घोषणेनुसार, एका ४३ वर्षीय अभिनेत्रीनं अव्वल स्थान पटकावले आहे.

वयाच्या चाळीशीतही तिने टिकवून ठेवलेले सौंदर्य आणि तिची वाढती 'स्टार पॉवर' यामुळे तिला हा मान देण्यात आला आहे.

'पीपल' मॅगझिनने आपली नवीन 'ब्युटी क्वीन' जाहीर केली आहे. हॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री ॲन हॅथवे (Anne Hathaway) हिने वयाच्या ४३ व्या वर्षी 'जगातील सर्वात सुंदर महिला' ठरण्याचा बहुमान पटकावला आहे.

या शर्यतीत तिने ऐश्वर्या राय बच्चनसारख्या जागतिक सुंदरींनाही मागे टाकले आहे.

हा सन्मान मिळाल्यानंतर ॲनने इन्स्टाग्रामवर 'पीपल' मॅगझिनचे आभार मानले आहेत. दोन दशकांहून अधिक काळ हॉलिवूड गाजवणाऱ्या ॲनची लोकप्रियता आजही तसूभरही कमी झालेली नाही, हेच यातून सिद्ध होते.

ॲन हॅथवे ही केवळ सुंदरच नाही, तर जगातील सर्वात श्रीमंत अभिनेत्रींपैकी एक आहे. तिच्या चित्रपटांनी जगभरात ६.८ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त कमाई केली आहे.

रिपोर्ट्सनुसार, ॲनची एकूण संपत्ती ७ अब्ज डॉलर्सच्या घरात आहे. तिच्याकडे अकादमी अवॉर्ड (Oscar), बाफ्टा, आणि गोल्डन ग्लोबसारखे प्रतिष्ठित पुरस्कार आहेत.

ॲन हॅथवेच्या चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी म्हणजे, तिचा गाजलेला चित्रपट 'द डेव्हिल वेअर्स प्राडा'चा सिक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

या चित्रपटात ती पुन्हा एकदा मेरिल स्ट्रीप आणि एमिली ब्लंट यांच्यासोबत दिसणार आहे. फॅशन जगतावर आधारित हा बिग बजेट ड्रामा १ मे २०२६ रोजी जगभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.