'दे धक्का 2' च्या टीमची लंडनमध्ये धम्माल; गौरी इंगवलेने शेअर केले Unseen photos

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2022 03:15 PM2022-08-09T15:15:00+5:302022-08-09T15:15:00+5:30

De dhakka 2: गौरी सोशल मीडियावर सक्रीय असून ती कायम तिच्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाइफविषयीचे अपडेट शेअर करत असते.

सिद्धार्थ जाधव, मकरंद अनासपुरे, शिवाजी साटम यांसारख्या दिग्गज कलाकारांची मांदियाळी असलेला 'दे धक्का 2' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला.

या चित्रपटाचं लंडनमध्ये चित्रीकरण पार पडलं असून या संपूर्ण टीमने शुटिंगसह लंडनमध्ये मोठी धम्माल केली.

सध्या सोशल मीडियावर या कलाकारांच्या लंडन टूरचे फोटो व्हायरल होत आहेत.

अभिनेत्री गौरी इंगवले हिने या टूरचे काही unseen photos इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

चित्रपटाच्या शुटिंगवेळी कलाकारांनी प्रचंड धम्माल केल्याचं या फोटोवरुन लक्षात येतं.

आई-वडिलांसह गौरीने लंडनमधील अनेक नवनवीन ठिकाणी भेट दिली.

गौरी आणि मेधा मांजरेकर या मायलेकींचा छानसा फोटो

गौरी सोशल मीडियावर सक्रीय असून ती कायम तिच्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाइफविषयीचे अपडेट शेअर करत असते.