जान्हवी कपूरच्या बॉयफ्रेंडचं आहे शिंदे घराण्याशी कनेक्शन; वयाच्या २६व्या वर्षीच नावावर केलीये 'इतकी' संपत्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2024 05:00 PM2024-01-09T17:00:51+5:302024-01-09T17:11:24+5:30

शिंदे घराण्याशी कनेक्शन ते सारा तेंडुलकरबरोबर स्पॉट; कोण आहे जान्हवीचा बॉयफ्रेंड शिखर पहाडिया? २६व्या वर्षी 'इतक्या' कोटींचा मालक

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. जान्हवीला तिचा बॉयफ्रेंड शिखर पहाडियासोबत अनेक ठिकाणी स्पॉट करण्यात आलं होतं.

गेल्या कित्येक वर्षांपासून जान्हवी आणि शिखर एकमेकांना डेट करत आहेत. कॉफी विथ करणमध्येही जान्हवीने शिखरबाबत भाष्य करत त्याला फॅमिली मॅन म्हटलं होतं.

जान्हवी आणि शिखर एकत्र महाकालाच्या दर्शनालाही गेले होते. त्यानंतर आंध्र प्रदेशातील तिरुमलामधील श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिरातही त्यांना स्पॉट करण्यात आलं होतं.

शिखरचा एका पार्टीतील सारा तेंडुलकरबरोबरचा फोटोही व्हायरल झाला होता. पार्टीसाठी शिखर आणि सारा एकाच गाडीतून जात असताना त्यांना स्पॉट करण्यात आलं होतं.

शिखर पहाडिया हा एक पोलो प्लेयर आहे. २०१३मध्ये त्याने रॉयल जयपूर पोलो स्क्वॅडमधून भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं. पोलो प्लेयरबरोबरच शिखर एक घोडेस्वारही आहे.

१३ वर्षांचा असल्यापासून शिखरने व्यवसायात लक्ष घालण्यास सुरुवात केली होती. त्याने वाधवान ग्लोबल कॅपिटल लंडन या कंपनीतही काम केलं आहे.

शिखर पहाडियाचं काँग्रेसमधील शिंदेच्या घराशी कनेक्शन आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू आहे.

सुशीलकुमार शिंदे यांची लेक स्मृती शिंदे आणि संजय पहाडिया यांचा तो मुलगा आहे.

शिखरची आई स्मृती शिंदे यादेखील मनोरंजनविश्वात कार्यरत आहेत. त्या एक निर्मात्याही आहेत.

अवघ्या २६ वर्षाचा शिखर १० मिलियन डॉलर म्हणजेच तब्बल ८४ कोटींचा मालक आहे. त्याचे इन्स्टाग्रामवरही ३ लाखांहून अधिक फॉलोवर्स आहेत.