Katrina Kaif : “तो काळ कठीण होता...”, रणबीरसोबतच्या ब्रेकअपनंतर खूप काही बोलली होती कतरिना कैफ

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2023 01:14 PM2023-04-14T13:14:01+5:302023-04-14T13:21:13+5:30

Katrina Kaif on break up with Ranbir Kapoor : रणबीर व कतरिनाचं रिलेशनशिप कधीच संपलं... आता दोघंही आपआपल्या आयुष्यात आनंदी आहेत. पण नीतू कपूर यांच्या एका पोस्टमुळे पुन्हा एकदा या नात्याची चर्चा होतेय...

आलिया भटशी लग्न करण्याआधी रणबीर कपूर अनेक अभिनेत्रींसोबत रिलेशनशिपमध्ये होता. यात कतरिना कैफ हिचंही नाव आहे. दोघंही अनेक वर्ष लिव्ह इनमध्ये राहिलेत. पण अचानक दोघांचं ब्रेकअप झालं.

सध्या पुन्हा एकदा रणबीर व कतरिनाच्या नात्याची चर्चा सुरु आहे. याला कारण ठरली ती नीतू कपूर यांची एक पोस्ट. “त्याने तुम्हाला सात वर्षे डेट केलं, याचा अर्थ तो तुमच्याशी लग्न करेल असं नाही. माझे काका सहा वर्षे मेडिसीन शिकले, पण आता ते डीजे आहेत,” अशा आशयाची इन्स्टा स्टोरी नीतू यांनी शेअर केली होती.

त्यांच्या स्टोरीचा हा स्क्रीनशॉट चांगलाच व्हायरल झाला होता. त्यानंतर नेटकऱ्यांनी नीतू कपूर यांच्या या पोस्टचा संबंध रणबीर कपूरची एक्स गर्लफ्रेंड दीपिका पादुकोण व कतरिना कैफशी जोडला होता. अशात आता कतरिनाची एक जुनी मुलाखत व्हायरल होतेय.

मिडे डेला दिलेल्या मुलाखतीत कतरिना तिच्या व रणबीरच्या ब्रेकअपबद्दल बोलली होती. ती म्हणाली होती, तो सगळ्यांत कठीण काळ होता. मी ज्या वेदना भोगत होते, त्याच वेदना माझी बहिणही भाेगत होती.

पुढे ती म्हणाली होती, त्या दिवसांत मी वाचन सुरू केलं होतं. मला त्यामुळे थोडी शांती मिळायची. माझ्या मित्रपरिवारानेही या काळात मला मोठा सपोर्ट केला. तो चॅप्टर आता संपला. त्याबद्दल मला मुळीच दु:ख नाही. त्यातून मी खूप काही शिकले.

अन्य एका मुलाखतीत ती म्हणाली होती, मी खूप भावुक आणि संवेदनशील आहे. मी कधीच कोणाला बदलण्याचा प्रयत्न केला नाही. मी कोणावरही माझ्या इच्छा कधी लादल्या नाहीत.

मी रणबीरच्या कुटुंबाच्या इतक्याही जवळ नव्हते, जितकं मला असायला हवं होतं. पण हे त्यांची पसंत होती आणि मी त्यात काहीही बोलू शकत नव्हते, असं ती म्हणाली होती.

असं म्हणतात की, रणबीर व कतरिनाच्या नात्यामुळे ऋषी कपूर व नीतू कपूर दोघंही खूश्श नव्हते. नीतू कपूर यांच्यामुळेच रणबीर व कतरिनाच्या नात्याचा दी एन्ड झाला, असंही मानलं जातं.