"नाना पाटेकर गँगस्टरचा भाऊ", तनुश्री दत्ताचे गंभीर आरोप, म्हणाली, "ते फक्त फोटोमध्ये समाजसेवा..."

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2023 12:44 PM2023-10-13T12:44:52+5:302023-10-13T12:52:24+5:30

"नाना पाटेकरांची इंटस्ट्रीत चांगली प्रतिमा नाही", तनुश्रीचं वक्तव्य, म्हणाली, "ते त्यांची पत्नी आणि मुलाबरोबर..."

सिनेसृष्टीपासून दूर असली तरी तनुश्री दत्ता सोशल मीडियावर सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. काही दिवसांपूर्वी तनुश्री राखी सावंत आणि नाना पाटेकरांवर गंभीर आरोप केल्यामुळे चर्चेत आली होती. आता तनुश्रीने राखीविरोधात ओशिवारा पोलिसांत FIR दाखल केला आहे.

आता पुन्हा तनुश्रीने नाना पाटेकरांवर गंभीर आरोप केले आहेत. "इंडस्ट्रीमध्ये नाना पाटेकरांची प्रतिमा चांगली नाही. ते फक्त फोटो आणि व्हिडिओतच समाजसेवा करतात."

"त्यांचे अभिनेत्रींबरोबर अफेअर आहेत. ते त्यांच्या कुटुंबियांसोबत राहत नाहीत. पत्नी आणि मुलाबरोबर नाना पाटेकर राहत नाहीत, ही गोष्ट सगळ्यांना माहीत आहे."

"नाना पाटेकरांचा भाऊ मन्या सुर्वे हा गँगस्टर होता. मला आताच ही गोष्ट माहीत झाली."

"जेव्हा मी या सगळ्या गोष्टींबाबत आवाज उठवला, तेव्हा माझ्यावर हल्ला करण्यात आला होता.मला या अडीच वर्षांत अनेक धमक्या मिळाल्या आहेत."

विवेक अग्निहोत्रींच्या 'द व्हॅक्सीन वॉर'मध्येही नाना पाटेकरांना घेण्यावरुन तनुश्रीने वक्तव्य केलं होतं. "नाना पाटेकर आणि विवेक अग्निहोत्रींबाबत आपण का बोलत आहेत? त्यांच्याबद्दल बोलून मला त्यांना प्रसिद्धी द्यायची नाही. आजही त्यांना त्यांचे चित्रपट चालवण्यासाठी माझ्या नावाची गरज भासते."

"२००८मध्ये नाना पाटेकरांचं माझ्याबरोबर भांडण झालं होतं तेव्हादेखील त्यांचा चित्रपट चालला नव्हता. जेव्हा त्यांचे चित्रपट चालत नाहीत. तेव्हा ते माझ्यासारख्या लोकांकडे येतात. जेणेकरुन, मी त्यांच्या चित्रपटात आयटम साँग करेन आणि त्यांचे चित्रपट चालतील."

"मीडिया त्यांच्या चित्रपटांबाबत तनुश्रीला विचारेल आणि त्यांचे चित्रपट चालतील. मी काहीतरी बोलेन ज्यांच्यामुळे त्यांच्या चित्रपटाला प्रसिद्धी मिळते. मला त्यांच्या चित्रपटाला कोणत्याही पद्धतीने प्रसिद्धी द्यायची नाही," असं तनुश्री म्हणाली होती.

तनुश्री आणि नाना पाटेकरांनी 'हॉर्न ओके प्लीज' या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. २००९ साली हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान नाना पाटेकरांनी गैरवर्तन केल्याचा आरोप तनुश्रीने केला होता.

तनुश्रीने मीटू प्रकरणातही नाना पाटेकरांवर लैंगिक गैरवर्तन केल्याचा गंभीर आरोप केला होता. नाना पाटेकरांनी तनुश्रीचे हे सर्व आरोप फेटाळून लावले होते.