‘तान्हाजी’मधील ‘या’ अभिनेत्रीबद्दल ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितआहेत का? खऱ्या आयुष्यात आहे डेंटिस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2021 04:36 PM2021-08-04T16:36:45+5:302021-08-04T16:44:52+5:30

‘तान्हाजी - द अनसंग वॉरिअर’ या चित्रपटात महाराणी सोयराबाईची भूमिका एका डॉक्टरने साकारली, असं सांगितलं तर तुम्हाला धक्का बसेल. पण हे खरं आहे.

‘तान्हाजी - द अनसंग वॉरिअर’ या चित्रपटात महाराणी सोयराबाईची भूमिका एका डॉक्टरने साकारली, असं सांगितलं तर तुम्हाला धक्का बसेल. पण हे खरं आहे.

अभिनेत्री ईलाक्षी गुप्ता हिनं ‘तान्हाजी - द अनसंग वॉरिअर’ या चित्रपटात महाराणी सोयराबाईची भूमिका साकारली होती. तिच्या भूमिकेचं प्रचंड कौतुक झालं होतं.

विदर्भ कन्या ईलाक्षी ही मूळची अकोल्याची. पेशानं ती डेंटिस्ट आहे. होय, काही काळ तिनं डेंटिस्ट म्हणून कामही केलं.

नृत्याची आवड होतीच. पुढं अभिनयातही आवड निर्माण झाली. मग ती मॉडेलिंगमध्ये आली आणि थेट मोठ्या पडद्यावरही झळकली.

ईलाक्षीचे आई-बाबाही डॉक्टर आहेत. पोरगी डॉक्टरकी सोडून हिरोईन बनणार म्हटल्यावर तिच्या आईबाबांची चिंता वाढली होती. पण ईलाक्षी ठाम होती. अखेर त्यांनी तिला होकार दिला.

ईलाक्षी लवकरच मराठी चित्रपटसृष्टीत पर्दापण करतेय. ‘भ्रम’ या मराठी सिनेमात तिची वर्णी लागली आहे.

तिचा ‘लव्ह यू शंकर’ हा तिचा सिनेमा प्रदर्शनासाठी सज्ज आहे. मात्र अद्याप त्याची रिलीज डेट आलेली नाही.

‘लव्ह यू शंकर’मध्ये ती श्रेयस तळपदेसोबत झळकणार आहे.

ईलाक्षी सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे. तिचे एकापेक्षा एक ग्लॅमरस फोटो इन्स्टावर आहेत.

फिटनेसप्रेमी असलेल्या ईलाक्षीनं शास्त्रीय संगीत व मार्शल आर्ट्सचंही प्रशिक्षण घेतलं आहे.