बिग बी ते रणवीर, अभिषेकपर्यंत! पत्नींना अनोख्या नावाने हाक मारतात हे स्टार्स

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2024 02:53 PM2024-02-01T14:53:41+5:302024-02-01T15:34:05+5:30

स्टार्स आपल्या पत्नींना कोणत्या नावाने हाक मारतात, हे जाणून घेऊयात...

बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि विकी कौशल हे बी-टाऊनचे परफेक्ट कपल आहेत. दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना आवडते. काही वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर २०२१ मध्ये दोघांनी राजस्थानमध्ये लग्नगाठ बांधली. तो कतरिनाला 'पॅनिक बटन' म्हणतो.

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांनी २० एप्रिल २००७ मध्ये लग्न केलं होतं. आज ही जोडी सर्वांना कपल गोल्स देताना दिसते. अभिषेक हा ऐश्वर्याला ऐश या नावाने हाक मारतो.

सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा आडवानी हे बॉलिवूडमधील लोकप्रिय कपल आहे. सिद्धार्थ आणि कियारा यांनी 7 फेब्रुवरी 2023 रोजी राजस्थानमधील सूर्यगढ पॅलेसच्या मंडपात सात फेरे घेतले होते. 'लव्ह, की आणि बी' या नावाने सिद्धार्थ कियाराला हाक मारतो.

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता रणवीर सिंह ही जोडी बॉलिवूडची पॉवर कपल मानली जाते. २०१५ मध्ये गुपचूपपणे साखरपुडा केल्यानंतर दीपिका आणि रणवीरने २०१८ मध्ये इटलीत लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नासाठी अतिशय जवळचे लोक सहभागी झाले होते. रणवीर हा दीपिकाला प्रेमाने "तितली" अस म्हणतो.

‘महानायक’ अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि जया बच्चन (Jaya Bachchan) यांचं 3 जून 1973 मध्ये लग्न पार पडले होते. आजही दोघे पूर्वीप्रमाणेच एकमेकांवर प्रेम करतात. या व्यतिरिक्त, प्रत्येक कठीण परिस्थितीत हे दोघेही एकमेकांना पूर्ण पाठींबा देतात. लग्नाला इतकी वर्ष झाली तरीही अमिताभ हे जया यांना 'देवी जी' असं म्हणतात.

मराठी चित्रपटसृष्टीतील सगळ्यात जास्त लोकप्रिय जोडी म्हणजे रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख. त्यांनी आपल्या प्रेमाचा सगळयांनाच आदर्श घालून दिला. लग्नाच्या इतक्या वर्षांनंतरही त्यांच्यातील प्रेम तसूभरही कमी झालेलं नाही.

रितेश जिनिलियाला 'बायको' आणि 'जीन्स 'या टोपणनावाने हाक मारतो. २०१२ मध्ये या जोडीने लग्नगाठ बांधली आणि आजपर्यंत सुखाने संसार करत आहेत.

रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) हे सर्वाचंच लाडकं कपल आहे. जवळजवळ 2 वर्ष हे दोघं एकमेंकांना खुल्लमखुल्ला डेट करत होते. त्यानंतर त्यांनी १४ एप्रिल २०२२ रोजी लग्न केलं. दोघांमधील प्रेम अनेकदा दिसून आलं आहे. रणबीर कपूर पत्नी आलियाला प्रेमाने 'आलू' म्हणतो. तसेच कधी-कधी तो तिला 'एलियन' म्हणून हाक मारतो.

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री करीना कपूर यांनी २०१२ मध्ये लग्न केले. लग्नाच्या इतक्या वर्षांनंतरही त्यांच्यातील प्रेम तसूभरही कमी झालेलं नाही. सैफ पत्नी करीनाला 'बेबो' म्हणून हाक मारतो.

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) हे बॉलिवूडमधील पॉवरफूल आणि सर्वांचे आवडते कपल आहे. अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर अनुष्का आणि विराटने २०१७ मध्ये इटलीमध्ये लग्न केले होते. ११ डिसेंबर २०२३ ला या कपलच्या लग्नाला सहा वर्षे पूर्ण झाली. दोघे कायमच कपल गोल्स देतात. विराट अनुष्काला प्रेमाने 'नुष्की' म्हणतो.