मानुषी छिल्लरचा हटके ‘बॉर्बी’ लूक पाहिला का? पिंक ड्रेसमध्ये खुललं सौंदर्य

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2023 08:09 PM2023-09-06T20:09:44+5:302023-09-06T20:18:35+5:30

मानुषी छिल्लरचे लेटेस्ट फोटो चर्चेत आले आहेत.

विश्वसुंदरी अभिनेत्री मानुषी छिल्लरनं नुकतंच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर खास फोटो शेअर केले आहेत.

सौंदर्यवती मानुषीचा 'पिंक अँड हॉट' लूक पाहून चाहते घायाळ झाले आहेत. तिच्या फोटोंची सोशल मीडियात जोरदार चर्चा आहे.

मानुषीने या गुलाबी ड्रेसमध्ये फोटोशूट केले आहे. खरंच या लुकमध्ये अभिनेत्री बार्बी डॉलपेक्षा कमी दिसत नाहीये. या प्रकारचा ड्रेस तुम्हाला वेगळा लुक देईल.

अभिनेत्रीचा हा लुक खूपच आकर्षक आहे. एखाद्या पार्टीला तुम्हीही या प्रकारचा ड्रेस घालू शकता.

मानुषी छिल्लर तिच्या लुक्स, स्टाइल आणि पर्सनॅलिटी आणि ड्रेसिंग सेन्ससाठी ओळखली जाते.

२०१७ साली मानुषी छिल्लरने मिस वर्ल्डचा किताब पटकावला आहे.

विश्वसुंदरीचा खिताब जिंकल्यानंतर मानुषीनं बॉलीवूडमध्ये एन्ट्री घेत 'सम्राट पृथ्वीराज' सिनेमात राजकुमारी संयोगिताची भूमिका साकारली. सम्राट पृथ्वीराज सिनेमाची जादू बॉक्स ऑफीसवर चालली नसली तरी मानुषीच्या भूमिकेनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं.

आता द ग्रेट इंडियन फॅमिली या आगामी चित्रपटात मानुषी ही अभिनेता विकी कौशलसोबतस्क्रिन शेअर करत आहे.