हिरवळ दाटे चोहीकडे... २१ वर्षांच्या अवनीतचा ग्लॅमरस लूक; तुम्ही पाहिलेत का Photos?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2023 05:11 PM2023-09-10T17:11:03+5:302023-09-10T17:46:44+5:30

Avneet Kaur Photos : टीकेला न घाबरणाऱ्या अवनीत कौरचा 'बिनधास्त' अंदाज तुम्हालाही करेल अवाक्

Avneet Kaur Photoshoot with side boob trend : अवघी २१ वर्षीय अवनीत तिच्या जबरदस्त लुक आणि ड्रेसिंग सेन्समुळे दररोज चर्चेत असते.

टीव्ही मालिका, बॉलिवूड चित्रपट यामुळे प्रसिद्धीझोतात आलेली अवनीत खऱ्या आयुष्यात खूपच ग्लॅमरस आहे.

नुकतेच अवनीतने एका चित्रपटातून बॉलिवूड पदार्पण केले. यातील तिच्या किसिंग सीनचा मुद्दा बराच गाजला.

बॉलिवूड पदार्पणानंतर अवनीत अधिकच बोल्ड आणि बिनधास्त होताना दिसत आहे. सोशल मीडियावर तिच्या नव्या फोटोशूटची चर्चा आहे.

अवनीतने स्वत: अगदी ताजा फोटोशूट शेअर केला आहे. या फोटोशूटमध्ये ती अतिशय सुंदर आणि स्टायलिश अवतारात दिसत आहे.

अवनीत कौरच्या ताज्या फोटोंची सध्या सर्वत्र चांगलीच चर्चा रंगली आहे. तरूणाईही तिची फॅन होत आहे.

नुकताच मुंबईत फॅशन जगताशी संबंधित एक भव्य दिव्य असा कार्यक्रम झाला. तिथे अवनीत हिरव्या रंगाच्या रिव्हिलिंग ड्रेसमध्ये दिसली.

या कार्यक्रमाचे हे मनमोहक फोटो तिने अधिकृत इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती वेगवेगळ्या पोज देताना दिसत आहे.

अवनीतने 2010 मध्ये 'डान्स इंडिया डान्स लिटिल मास्टर' मधून करियरला सुरूवात केली. त्यावेळी ती तितकी ग्लॅमरस लूकमध्ये दिसली नव्हती.

रिअॅलिटी डान्स शोमध्ये तिने उपांत्य फेरीही गाठली. यानंतर ती डान्स सुपरस्टारमध्ये आली आणि तिथून डान्ससोबत अभिनयातही करियर सुरू झाले.

सध्या तिने घातलेला हिरवा रिव्हिलिंग गाऊन एक स्टाइल स्टेटमेंट असल्याचे फॅशन दिवा व एक्स्पर्ट बोलत आहेत.

अवनीतच्या या हाय थाय स्लीट गाऊनला हॉल्टर नेक असल्याने तिने 'साईड बूब' ट्रेंड फॉलो केल्याचे बोलले जातेय.

फॅशन जगतात तिच्या ट्रेंड्स आणि स्टाइलची स्तुती होत असली तरी सोशल मीडियावर काही लोक तिला ट्रोल करताना दिसतात.

काही जण तिच्या गाऊनच्या लांबीवरून वरून तिला ट्रोल करत आहेत, तर काही जण थेट तिला भारतीय संस्कृती अन् संस्कारांची आठवण करून देताना दिसत आहेत.

असे असले तरी अवनीत या आऊटफिटमध्ये सुंदर दिसत असल्याचे बहुतांश फॅन्सचं मत आहे. त्यामुळे चाहत्यांना अवनीतचा हा लूक नक्कीच आवडल्याचं दिसतंय.