पिंक फ्रॉक, गोड स्माईल; काजोलच्या कडेवर असलेली 'ही' चिमुकली आज गाजवतेय बॉलिवूड
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2026 12:18 IST2026-05-18T12:04:45+5:302026-05-18T12:18:20+5:30
ही गोड मुलगी आज बॉलिवूडची सर्वात सुंदर अभिनेत्री आहे.

आमिर खान, अजय देवगण, काजोल आणि जुही चावला यांचा 'इश्क' हा मल्टीस्टारर सिनेमा आठवतोय? यामध्ये काजोलने एका चिमुकलीला कडेवर घेतलेला हा फोटो अनेकदा व्हायरल होतो.

१९९७ मध्ये आलेल्या 'इश्क' चित्रपटात काजोलच्या कडेवर असलेली ही चिमुकली आज बॉलिवूडमध्ये आघाडीवर आहे. गुलाबी फ्रॉक घातलेली ती गोड मुलगी कोण?

या चिमुकलीने नंतर आमिरच्याच सिनेमातून मुख्य अभिनेत्री म्हणून पदार्पण केलं. इतकंच नाही तर तिच्या आमिरसोबतच रिलेशनशिपच्या अफवा पसरल्या.

ही अभिनेत्री आहे फातिमा सना शेख. फातिमाने 'इश्क' सिनेमासोबतच 'चाची ४२०', 'बडे दिलवाला', 'वन टू का ४' या सिनेमांमध्येही बालकलाकार म्हणून काम केलं.

काही वर्षांनी २०१६ साली फातिमाने 'दंगल' सिनेमातून मुख्य अभिनेत्री म्हणून कामाला सुरुवात केली. यात तिने गीता फोगाटची भूमिका साकारली. आमिर खानने यामध्ये तिच्या वडिलांच्या भूमिकेत होता.

'इश्क' मध्ये तिने बालकलाकार म्हणून आमिरसोबत स्क्रीन शेअर केली होती. काही वर्षांनी तिला त्याच्याच सिनेमातून ओळख मिळाली हा तिच्यासाठी सुंदर योगायोग होता.

'दंगल'नंतर फातिमाला आमिरसोबत 'ठग्स ऑफ हिंदुस्तान'मध्ये काम करण्याची संधी मिळाली. मात्र या सिनेमानंतर तिचं आमिरसोबतच नाव जोडण्यात आलं आणि त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा रंगल्या.

फातिमा नुकतीच 'गुस्ताख इश्क'मध्ये दिसली. यामध्ये तिची विजय वर्मासोबत जोडी जमली होती. तसंच तिचे 'आप जैसा कोई', 'मेट्रो इन दिनो', 'लुडो', 'धकधक', 'अजीब दास्तां' हे सिनेमेही गाजले.
















