वयाच्या पन्नाशीमध्ये भाग्यश्रीने फ्लॉन्ट केली टोन्ड फिगर; सिल्कच्या साडीतील फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2022 05:13 PM2022-08-03T17:13:45+5:302022-08-03T17:16:57+5:30

Bhagyshree: तिच्या या लूककडे पाहिल्यावर तिने पन्नाशी पार केलीये असं कोणालाही वाटणार नाही.

'मैंने प्यार किया' या चित्रपटाच्या माध्यमातून तुफान लोकप्रियता मिळवलेली अभिनेत्री म्हणजे भाग्यश्री.

भाग्यश्री आज कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

गेल्या काही काळात भाग्यश्रीचा कलाविश्वात पूर्वीसारखा वावर राहिलेला नाही.

भाग्यश्री सोशल मीडियावर कमालीची सक्रीय असून बरेचदा ती तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.

अलिकडेच भाग्यश्रीने सिल्कच्या साडीत फोटोशूट केलं असून त्यातील काही फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

मरुन रंगाच्या सिल्कच्या साडीमध्ये भाग्यश्री कमालीची सुंदर दिसत आहे.

इतकंच नाही तर तिच्या लूककडे पाहिल्यावर तिने पन्नाशी पार केलीये असं कोणालाही वाटणार नाही.

भाग्यश्रीचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.