बॉलिवूडचे संस्कारी बाबूजी आलोक नाथ यांची बहीणदेखील आहे अभिनेत्री; अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये केलंय काम

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2022 01:54 PM2022-04-04T13:54:29+5:302022-04-04T13:59:33+5:30

Alok nath:आलोक नाथ यांची बहीणदेखील लोकप्रिय अभिनेत्री आहे.तिने आपल्या अभिनयशैलीच्या जोरावर छोट्या पडद्यावर हक्काचं स्थान निर्माण केलं आहे.

अभिनेता आलोक नाथ हे नाव बॉलिवूडच्या कोणत्याही व्यक्तीसाठी नवीन नाही. अनेक चित्रपटांमध्ये प्रेमळ वडिलांची भूमिका साकारुन ते लोकप्रिय झाले आहेत.

एक आदर्श, प्रेमळ वडील म्हणून त्यांनी तुफान लोकप्रियता मिळवली. त्यामुळेच आज ते बॉलिवूडचे संस्कारी बाबूजी या नावाने ओळखले जातात.

आलोक नाथ यांच्या प्रोफेशनल लाइफविषयी सारेच जण जाणतात. पण, आज त्याच्या पर्सनल लाइफविषयी जाणून घेऊयात.

आलोक नाथ यांची बहीणदेखील लोकप्रिय अभिनेत्री आहे.तिने आपल्या अभिनयशैलीच्या जोरावर छोट्या पडद्यावर हक्काचं स्थान निर्माण केलं आहे.

आलोक नाथ यांच्या बहिणीचं नाव विनीता मलिक आहे. विनिता लोकप्रिय अभिनेत्री असून त्यांनीदेखील अनेक मालिकांमध्ये प्रेमळ आई, सासू, आजी अशा भूमिका साकारल्या आहेत.

काल भैरव रहस्य, दिल मिल गए, छोटी सरदारनी, देस में निकला होगा चांद, ये रिश्ता क्या कहलाता है आणि कुमकुम: प्यारा सा बंधन यांसारख्या अनेक मालिकांमध्ये त्यांनी काम केलं आहे.

विनीता सोशल मीडियावरही कमालीच्या सक्रीय आहेत. त्या अनेकदा त्यांचे सेटवरील फोटो शेअर करत असतात.

विनीता यांनी आजपर्यंत अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे.

आलोक नाथ यांनी १९८२ मध्ये प्रदर्शित झालेल्या गांधी या चित्रपटातून कलाविश्वात पदार्पण केलं होतं. त्यानंतर त्यांनी १९८६ मध्ये छोट्या पडद्यावर एन्ट्री केली. बुनियाद या मालिकेत त्यांनी पहिल्यांदा काम केलं.