Alia Bhatt at Cannes 2026: 'कान्स'चा पहिलाच दिवस आलिया भटने गाजवला! रेड कार्पेटवर ग्लॅमरस अंदाजात वेधलं सर्वांचं लक्ष, फोटो बघाच
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2026 09:03 IST2026-05-13T08:40:43+5:302026-05-13T09:03:17+5:30
मंगळवार, १२ मे २०२६ रोजी बहुचर्चित आंतरराष्ट्रीय कान्स फिल्म फेस्टिव्हल (Cannes Film Festival) ला दिमाखात सुरुवात झाली असून, बॉलिवूड अभिनेत्री आलिया भटने पहिल्याच दिवशी रेड कार्पेटवर आपल्या सौंदर्याची मोहिनी घातली आहे.

मंगळवार, १२ मे २०२६ रोजी बहुचर्चित आंतरराष्ट्रीय कान्स फिल्म फेस्टिव्हल (Cannes Film Festival) ला दिमाखात सुरुवात झाली असून, बॉलिवूड अभिनेत्री आलिया भटने पहिल्याच दिवशी रेड कार्पेटवर आपल्या सौंदर्याची मोहिनी घातली आहे.

आलिया भटने कान फेस्टिव्हलच्या पहिल्याच दिवशी लाइमलाइट स्वतःकडे खेचून घेतली आहे. तिने पीच रंगाचा 'ऑफ शोल्डर' गाउन परिधान केला होता. आलिया या ड्रेसमध्ये एकदम सुंदर दिसत होती.

आलियाने या गाउनवर मॅचिंग नेकलेस घालून आपला लूक पूर्ण केला. मोकळे सोडलेले केस आणि दिलखेचक अदा दाखवत आलियाने फोटो आणि व्हिडीओ शूट केलं आहे.

आलियाने या स्टायलिश गाउनसोबत एक दुपट्टा देखील कॅरी केला होता. रेड कार्पेटवर हा दुपट्टा ती अतिशय आत्मविश्वासाने फ्लॉन्ट करताना दिसली. एकूणच आलियाच्या या लूकची सध्या चांगलीच चर्चा आहे.

आलियाचा हा खास दुपट्टा ड्रेस ऑस्ट्रेलियन फॅशन डिझायनर तमारा राल्फ यांनी डिझाइन केला आहे, तर आलियाचा हा संपूर्ण लूक रिया कपूरने स्टाईल केला आहे.

कान्स फेस्टिव्हलला जाण्याआधी आलिया समुद्रकिनारी एका हॉटेलमध्ये मुक्कामाला होती. तिथेही आलियाने खास फोटोशूट करुन चाहत्यांचं प्रेम मिळवलं

आलिया भटने गेल्या वर्षी कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये पदार्पण केले होते. तिच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, ती लवकरच 'लव्ह अँड वॉर' आणि 'अल्फा' यांसारख्या मोठ्या चित्रपटांमध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

















