अक्षय कुमारची हिरोईन सुप्रिया! पन्नाशी ओलांडली तरी लग्न केलं नाही, प्रेमात झालेली फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2026 12:17 IST2026-05-02T12:11:14+5:302026-05-02T12:17:29+5:30
मनोरंजन सृष्टीतील अशी अभिनेत्री जिची पन्नाशी ओलांडून गेली तरीही तिने लग्न केलं नाही. या अभिनेत्रीने अक्षय कुमार, शाहरुख खान यांच्यासह काम केलंय

मनोरंजन सृष्टीतील अशी अभिनेत्री जीची पन्नाशी ओलांडून गेली तरीही तिने लग्न केलं नाही. ही अभिनेत्री म्हणजे सुप्रिया कर्णिक. सुप्रिया यांनी लग्न का केलं नाही, यामागचं महत्वाचं कारण सांगितलं आहे.

सुप्रिया यांनी एका podcast मध्ये सांगितले की, वयाच्या २५-२६ व्या वर्षी त्यांना लग्न करायची इच्छा होती, पण काळानुसार त्यांच्या विचारात बदल झाला. आता त्या लग्नाला आयुष्याचा अविभाज्य भाग मानत नाहीत.

सुप्रिया कर्णिक कधीही कोणा 'परफेक्ट' व्यक्तीच्या शोधात नव्हत्या, कारण त्यांच्या मते परफेक्ट जोडीदार कसा हवाय, यासाठी कोणताही ठराविक निकष नसतो.

दैनिक भास्करच्या एका वृत्तानुसार, २९ मार्च २०१२ रोजी दोघांनी लग्न केलं. मात्र, लग्न झाल्याच्या १० दिवसांमध्ये सुप्रिया यांचा पती घरातून गायब झाला. ऐवढचं नाही तर जाताना त्याने घरातील ३५ हजार रुपयेदेखील नेले, असा दाव सुप्रिया यांनी केला होता.

एका मुलाखतीमध्ये बोलताना सुप्रिया म्हणाल्या, मी अनेकवेळा प्रेमात पडले. पण, प्रेमात माझी फसवणूक झाली. ज्यांनी माझी फसवणूक केली. त्या व्यक्तींना चोप दिल्याचंही त्यांनी सांगितलं. शिवाय पुन्हा असं कोणत्या मुलीसोबत करशील तर याद राख, अशी ताकीदही दिली होती.

मन दुखावण्याचा अनुभव केवळ रोमँटिक नात्यापुरता मर्यादित नसतो, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यांचे म्हणणे आहे की, बहीण, भाऊ किंवा मित्र-मैत्रीण कोणीही मन दुखवू शकते. "माझ्या मनात सर्वांसाठी प्रेम आहे, पण त्यांनी माझ्यासोबत जे केले ते मी विसरत नाही," असंही त्या म्हणाल्या.

सुप्रिया कर्णिक अजूनही सिंगल आहेत. सध्या त्या लग्न करणार नाहीत हे सर्वांना स्पष्ट झालं आहे. सुप्रिया सध्या अध्यात्माकडे वळल्या आहेत. अभिनयासोबतच अनेक तरुण-तरुणींना त्या अध्यात्माचे धडे देतात.

















