अभिनेत्री अलाया एफ हिच्या ग्लॅमरस अदा, फाटो सर्वत्र व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2024 05:44 PM2024-04-23T17:44:45+5:302024-04-23T17:57:09+5:30

अलाया फर्निचरवाला हिनं बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाच्या जोरावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

अलायाने तिचा जबरदस्त लूक आणि अभिनयाने वेगळीच छाप उमटवली आहे.

अलाया तिच्या हटके अदांमुळे कायम चर्चेत असते. अलाया हिच्या फॅशन सेन्सच्या देखील सर्वत्र चर्चा रंगलेल्या असतात.

सोशल मीडियावर अलाया कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर अलाया हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

नुकतेच अलायानं काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यात तिचा ग्लॅमरस अवतार पाहायला मिळत आहे.

या फोटोंमध्ये अलाया बोल्ड आणि ब्युटिफूल दिसत असून तिचे हे फोटो व्हायरल होत आहेत.

तिचे हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत. अलायाच्या ग्लॅमरस अदा पाहून चाहते फिदा झाले आहेत.

बोल्ड मेकअप आणि मोकळे केस सोडून तिनं चाहत्यांना घायाळ केलं आहे. सुपर स्टाइलिश आउटफिटमध्ये कॅमेर्‍यासाठी पोज कशा द्यायच्या हे तिला चांगलचं माहित आहे.

अलाया एफने 2020 मध्ये 'जवानी जानेमन' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.

अलाया ही पूजा बेदीची मुलगी आहे. ​​अलायाने सैफ अली खानच्या 'जवानी जानेमन' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता.