'सरकारी नोकरी करावी आणि..' ; अभिनय क्षेत्राविषयी काय आहे आकाशचं मत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2023 18:53 IST2023-05-19T18:48:16+5:302023-05-19T18:53:08+5:30

Akash thosar: गेल्या काही दिवसांपासून आकाश त्याच्या पर्सनल आयुष्यामुळे चर्चेत येत आहे. यामध्ये त्याचं कुटुंब, त्याची लव्हलाइफ यांची सर्वाधिक चर्चा रंगल्याचं पाहायला मिळत आहे.

What is Akash THOSAR opinion about the acting field | 'सरकारी नोकरी करावी आणि..' ; अभिनय क्षेत्राविषयी काय आहे आकाशचं मत?

'सरकारी नोकरी करावी आणि..' ; अभिनय क्षेत्राविषयी काय आहे आकाशचं मत?

'सैराट' (sairat) सिनेमातून मराठी कलाविश्वात पदार्पण करणारा अभिनेता म्हणजे आकाश ठोसर (akash thosar). अलिकडेच आकाश, नागराज मंजुळे (nagraj manjule) यांच्या घर बंदूक बिरयानी (ghar banduk biryani) या  सिनेमात  झळकला. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर त्याची चर्चा होत आहे. यामध्येच त्याने कलाविश्वात त्याची एन्ट्री कशी झाली आणि त्यापूर्वी त्याची कोणती स्वप्न होती यावर त्याने भाष्य केलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून आकाश त्याच्या पर्सनल आयुष्यामुळे चर्चेत येत आहे. यामध्ये त्याचं कुटुंब, त्याची लव्हलाइफ यांची सर्वाधिक चर्चा रंगल्याचं पाहायला मिळत आहे. यात अलिकडेच त्याने एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने अभिनेता होण्यापूर्वी पाहिलेल्या छोट्याश्या स्वप्नाविषयी भाष्य केलं.

गोकुळासारखं आहे आकाश ठोसरचं कुटुंब; पहा कोण आहे त्याचा फॅमिलीमध्ये

आतापर्यंतच्या प्रवासाबद्दल काय वाटतं? असा प्रश्न आकाशला विचारण्यात आला होता. त्यावर, "माझ्यासाठी हा प्रवास अजूनही स्वप्नवतच आहे. मी या जागी असेन असा कधी विचारही केला नव्हता. किंवा, असं काही स्वप्नही पाहिलं नव्हतं. मी मध्यमवर्गीय कुटुंबातला मुलगा आहे. त्यामुळे सरकारी नोकरी करावी आणि आई-बाबांसाठी छान घर बांधावं असा विचार होता", असं आकाश म्हणाला.

'माझी एक्स गर्लफ्रेंड नक्कीच जळत असेल'; सायलीच्या प्रश्नावर आकाशने दिलेल्या उत्तराची चर्चा

पुढे तो म्हणतो, "पोलीस आणि आर्मी भरतीसाठीही मी गेलो होत. स्पर्धा परीक्षेचा विचार केला होता. मात्र, आता या क्षेत्रात स्थिरावलो आहे. त्यामुळे पालकांनाही समाधान वाटतंय. प्रेक्षकांचं प्रेम तर सोबत आहेच."

दरम्यान, सैराट या सिनेमामुळे आकाशला पहिला ब्रेक मिळाला. तेव्हापासून त्याच्या यशाची गाडी सुसाट वेगाने पळत आहे. आकाशने मराठीसह हिंदीमध्येही काम केलं आहे. आज तरुणींमध्ये आकाशची विशेष क्रेझ पाहायला मिळते.
 

Web Title: What is Akash THOSAR opinion about the acting field