“अजय देवगणबरोबर तुलना व्हावी, कारण...”, तान्हाजी मालुसरेंची भूमिका साकारलेल्या अजय पूरकर यांचं मोठं वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2023 05:23 PM2023-08-15T17:23:54+5:302023-08-15T17:25:01+5:30

दिग्पाल लांजेकर यांच्या 'सुभेदार' चित्रपटात अजय पूरकर तान्हाजी मालुसरेंच्या भूमिकेत दिसणार आहेत.

subhedar tanhaji malusare actor ajay purkar said my role should be compared with ajay devgn | “अजय देवगणबरोबर तुलना व्हावी, कारण...”, तान्हाजी मालुसरेंची भूमिका साकारलेल्या अजय पूरकर यांचं मोठं वक्तव्य

“अजय देवगणबरोबर तुलना व्हावी, कारण...”, तान्हाजी मालुसरेंची भूमिका साकारलेल्या अजय पूरकर यांचं मोठं वक्तव्य

googlenewsNext

दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘सुभेदार’ या ऐतिहासिक चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. या चित्रपटातून सुभेदार नरवीर तान्हाजी मालुसरे यांच्या शौर्याची असिम गाथा प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर अनुभवता येणार आहे. ‘सुभेदार’ चित्रपटाचा ट्रेलर आणि त्यातील गाण्यांनाही प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटात अभिनेता अजय पूरकर यांनी तान्हाजी मालुसरेंची भूमिका साकारली आहे.

सिंहगडाच्या लढाईचा थरार आणि तान्हाजी मालुसरेंच्या शौर्याची गाथा सांगणारा ‘तान्हाजी’ हा बॉलिवूड चित्रपट २०२० साली प्रदर्शित झाला होता. ओम राऊतने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. तर बॉलिवूड अभिनेता अजय देवगण या चित्रपटात मुख्य भूमिकेत होता. त्याने तान्हाजी मालुसरेंची भूमिका साकारली होती. अजय पूरकर यांनी तान्हाजी मालुसरेंची भूमिका साकारण्यावरुन अजय देवगणबरोबर तुलना होण्याबाबत 'चंदेरी दुनिया' या युटु्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत वक्तव्य केलं आहे. अजय देवगणबरोबर माझी तुलना व्हावी अशी इच्छा असल्याचं ते म्हणाले आहेत.

‘गदर २’च्या यशानंतर ‘गदर ३’ येणार? सनी देओलच्या चित्रपटाबाबत दिग्दर्शक म्हणाले...

“याआधी तान्हाजी मालुसरेंवर हिंदीत चित्रपट आला आहे. तर याबाबत दडपण होतं का?” असा प्रश्न अजय पूरकर यांना विचारण्यात आला. यावर उत्तर देत ते म्हणाले, “नाही...माझी अजय देवगणबरोबर तुलना व्हावी अशी इच्छा आहे. कारण, अस्सल मराठा योद्धा कसा असतो आणि हिंदीत ते कसं दाखवतात, हे लोकांनी बघून ठरवावं, असं मला वाटतं.”

‘सुभेदार’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुन्हा बदलली, समोर आलं मोठं कारण

दरम्यान, ‘सुभेदार’ हा चित्रपट १८ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. पण काही तांत्रिक अडचणींमुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. आता हा चित्रपट येत्या २५ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. सुभेदार चित्रपटात चिन्मय मांडलेकर, मृणाल कुलकर्णी, शिवानी रांगोळे, विराजस कुलकर्णी या कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.  

Web Title: subhedar tanhaji malusare actor ajay purkar said my role should be compared with ajay devgn

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.