Nagraj Manjule : “त्यांचं आकाशवरच जास्त प्रेम...” सल्ल्या, बाळ्या, प्रिन्स आणि जब्या नागराज अण्णांवर नाराज

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2023 02:49 PM2023-04-07T14:49:07+5:302023-04-07T14:57:39+5:30

होय, ‘घर बंदूक बिरयानी’ या चित्रपटात अभिनेता आकाश ठोसर एकटाच नाही तर अरबाज शेख, सुरज पवार, सोमनाथ अवघडे, तानाजी गळगुंडे असे सगळे कलाकारही आहेत. पण...

Somnath Avghade Tanaji Galgunde Arbaj Shaikh Angry On Nagraj Manjule | Nagraj Manjule : “त्यांचं आकाशवरच जास्त प्रेम...” सल्ल्या, बाळ्या, प्रिन्स आणि जब्या नागराज अण्णांवर नाराज

Nagraj Manjule : “त्यांचं आकाशवरच जास्त प्रेम...” सल्ल्या, बाळ्या, प्रिन्स आणि जब्या नागराज अण्णांवर नाराज

googlenewsNext

नागराज मंजुळेंचा (Nagraj Manjule) ‘घर बंदूक बिरयानी’ (Ghar Banduk Biryani) हा चित्रपट आज प्रदर्शित झाला. नागराज अण्णांची या सिनेमात तडफदार पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. आकाश ठोसर, सयाजी शिंदे अन् सायली पाटीलही यांच्याही यात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. या सिनेमाच्या प्रमोशनसाठी नागराज मंजुळे, आकाश ठोसर, सयाजी शिंदे, सायली सर्वांनी अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला. पण काही कलाकार मात्र पडद्यामागेच राहिलेत. आता त्यांनी याबद्दल जाहिर नाराजी व्यक्त केली आहे. होय, ‘घर बंदूक बिरयानी’ या चित्रपटात अभिनेता आकाश ठोसर एकटाच नाही तर अरबाज शेख, सुरज पवार, सोमनाथ अवघडे, तानाजी गळगुंडे असे सगळे कलाकारही आहेत. पण ‘घर बंदूक बिरयानी’च्या प्रमोशन इव्हेंटमध्ये हे कुठेही दिसले नाहीत. त्याबद्दलच त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

 नागराज यांच्या बहुतांश सिनेमात आकाश ठोसर दिसतोच. ‘घर बंदूक बिरयानी’ या चित्रपटातही त्यांनी आकाशला घेतलं. सिनेमाच्या प्रमोशनसाठीही नागराज आकाशलाच सोबत फिरवत आहेत. मुळात हीच नाराजी   सल्ल्या, बाळ्या, प्रिन्स आणि जब्या अर्थात सैराटमधने अरबाज शेख व तानाजी गळगुंडे, फॅन्ड्रीमधला सोमनाथ अवघडे व सूरज पवार या कलाकारांनी बोलून दाखवली आहे.  

‘आटपाट प्रॉडक्शन’ला दिलेल्या मुलाखतीत सुरुवातीला अरबाज शेख, सुरज पवार, सोमनाथ अवघडे, तानाजी गलगुंडे हे कलाकार ‘घर बंदूक बिरयानी’च्या प्रमोशनबद्दल बोलताना दिसत आहेत. सल्ल्या, बाळ्या, प्रिन्स आणि जब्या नागराज अण्णांवर नाराज, अशा शीर्षकासह हा मुलाखतीचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. आपल्याला का फिरवत नाहीयेत. आपल्याला का सोबत नेत नाहीये. असं करू आपण आपलाच एक आटपाटला मुलाखतीचा व्हिडीओ करू अन् तो अण्णांना व्हाट्सअपवर पाठवून देऊ, असं व्हिडीओच्या सुरूवातीला सगळे म्हणतात. इंटरव्ह्यू भारी व्हायला हवा. मग बघा, आपल्यालाही सोबत फिरवतील...,आपल्या प्रमोशनला फिरवलं पाहिजे, हेच आपलं टार्गेट आहे. त्यामुळे इंटरव्ह्यू कडक झाला पाहिजे, असं म्हणत या मजेशीर मुलाखतीची सुरूवात होते. मुलाखतीत हे सगळे प्रमोशनसाठी तू का गेला नाही?’ असं एकमेकांना विचारताना दिसत आहेत. नागराज अण्णा आकाशसोबत ‘घर बंदूक बिरयानी’ या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करत आहेत. महाराष्ट्रातील विविध शहरांना भेट देत आहेत.  पण त्यांनी आपल्याला कुठेच प्रमोशनसाठी नेलं नाही. अण्णा, तुम्ही आम्हाला फक्त या म्हणून सांगा, आम्ही एसटीने तिकिटं काढून तिथे येतो, आम्ही पण कुठेतरी दिसायला हवं ना, असं हे सगळे म्हणत आहेत. अर्थात हा सगळा गमतीचा मामला आहे.  

अण्णांचं आकाश ठोसरवरच जास्त प्रेम...
यावेळी तानाजी नागराज मंजुळे यांचं सर्वात जास्त प्रेम कोणावर आहे असा प्रश्न करतो, तेव्हा सगळेजण एकमताने आकाश ठोसरचं नाव घेतात. अर्थात हेही मस्करीत. चौघेही व्हिडीओत धम्माल किस्से सांगत आहेत. अण्णांवरचं प्रेमही व्यक्त केलं आहे. अण्णांनी आमच्या सर्वांवरच खूप प्रेम दिलं. आम्हाला नवी ओळख दिली. आजही ते आम्हाला सोबत घेऊन चालतात. प्रत्येक चित्रपटात छोटी का असेना भूमिका देतात. अण्णांच्या सिनेमाचा भाग हाच एक आनंदाचा क्षण असतो. आपल्यावरही नागराज अण्णांचं तितकंच प्रेम आहे, असंही हे सर्वजण सांगताना दिसत आहे.

Web Title: Somnath Avghade Tanaji Galgunde Arbaj Shaikh Angry On Nagraj Manjule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.