Shocking: लग्नाआधीच प्रेग्नंट आहे ही मराठमोळी अभिनेत्री?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2017 05:57 AM2017-05-31T05:57:43+5:302017-05-31T11:27:43+5:30

सेलिब्रेटींच्या आयुष्यातील सगळ्या घडामोडी जाणून घेण्यासाठी रसिकांनाही कमालीची उत्सुकता असते. त्यात सेलिब्रेटींनाही त्यांच्याशी निगडीत सगळ्या गोष्टी शेअर करण्यासाठी सोशल ...

Shocking: A Marathi Marriage Actress Before Pregnancy? | Shocking: लग्नाआधीच प्रेग्नंट आहे ही मराठमोळी अभिनेत्री?

Shocking: लग्नाआधीच प्रेग्नंट आहे ही मराठमोळी अभिनेत्री?

googlenewsNext
लिब्रेटींच्या आयुष्यातील सगळ्या घडामोडी जाणून घेण्यासाठी रसिकांनाही कमालीची उत्सुकता असते. त्यात सेलिब्रेटींनाही त्यांच्याशी निगडीत सगळ्या गोष्टी शेअर करण्यासाठी सोशल मीडिया हा एक उत्तम पर्याय मिळाला आहे. त्यामुळे सतत एक्टीव्ह राहाता छोट्यातल्या छोट्या गोष्टी सेलिब्रेटी सतत अपडेट करताना दिसतात. अगदी प्रोफेशनल लाईफपासून ते पर्सनल सगळ्या गोष्टी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांनाही मिळत असतात.यातला एक भाग म्हणजे सोशल मीडियाचा वापर करत अभिनेत्री त्यांची प्रेग्नंसी खूप ग्लॅमरस करत फुल ऑन एन्जॉय करताना दिसताये. बॉलिवूडमध्ये करिना कपूर हे त्याचे उत्तम उदाहरण. आता आणखी एक मराठमोळी अभिनेत्रीचा प्रेग्नंट असल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा फोटो पाहताच अनेकांना धक्का बसलाय कारण ही अभिनेत्री आहे पूजा सावंत. होय, व्हायरल झालेला फोटोत  पूजा सांवत प्रेग्नंट असल्याचं दिसतंय. इतकंच नाहीतर 14 जुलै 'ड्यू डेट'  दिली असल्याचेही तिने म्हटले आहे. तिचा हा फोटो पाहून तिला अनेकांनी वेगवेगळे प्रश्न विचारताना दिसतायेत. मात्र आता या फोटोचे मागचे रहस्य आम्ही उघड करणार आहोत.पूजाने हा खटाटोप केला आहे तो तिच्या आगामी सिनेमासाठी. त्यामुळे एक वेगळ्या पध्दतीने  सिनेमाची पब्लिसिटी करण्यात सध्या पूजा बिझी आहे. तिचा आगामी सिनेमा 'लपाछपी' सिनेमा १४ जुलैला प्रदर्शित होत आहे. त्यामुळे पूजाने तिच्या चाहत्यांना तिच्या स्टाइलने  खुशखबरच दिली आहे असे समजणे चुकीचे ठरणार नाही. यापूर्वीही विद्या बालनने कहानी सिनेमासाठी प्रेग्नंट बनत मुंबईच्या टॅक्सीमध्ये फिरत सिनेमाचे प्रमोशन केले होते. त्यामुळे विद्या बालन स्टाइलने पूजा सांवत प्रमोशन करत असल्याचेही बोलले जात आहे. 

Web Title: Shocking: A Marathi Marriage Actress Before Pregnancy?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.