Raja Shivaji: रितेश देशमुखची भूमिका असलेल्या 'राजा शिवाजी'च्या ट्रेलरची उत्सुकता शिगेला, काय असणार खास?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2026 16:42 IST2026-04-19T16:39:21+5:302026-04-19T16:42:14+5:30
गेल्या अनेक दिवसांपासून सर्वांना 'राजा शिवाजी' सिनेमाच्या ट्रेलरची उत्सुकता आहे. आता सिनेमाच्या ट्रेलरबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे.

Raja Shivaji: रितेश देशमुखची भूमिका असलेल्या 'राजा शिवाजी'च्या ट्रेलरची उत्सुकता शिगेला, काय असणार खास?
रितेश देशमुखची प्रमुख भूमिका असलेल्या 'राजा शिवाजी' सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे. महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारीत हा सिनेमा थोड्याच दिवसांत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सर्वांना 'राजा शिवाजी' सिनेमाच्या ट्रेलरची उत्सुकता आहे. आता सिनेमाच्या ट्रेलरबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे. 'राजा शिवाजी'चा ट्रेलर लाँच सोहळा उद्या अर्थात २० एप्रिलला मुंबईत पार पडणार आहे. जाणून घ्या काय असणार खास?
'राजा शिवाजी'च्या ट्रेलर लाँचविषयी
रितेश विलासराव देशमुख दिग्दर्शित 'राजा शिवाजी' सिनेमाचा ट्रेलर लाँच उद्या सोमवारी २० एप्रिलला पार पडणार आहे. सिनेमातील प्रमुख कलाकार या ट्रेलर लाँच सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. याआधी 'राजा शिवाजी' सिनेमाच्या अँथम साँगने प्रेक्षकांच्या अंगावर रोमांच उभे केले. आता ट्रेलरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथेची झलक पाहायला मिळणार आहे. याशिवाय इतक्या दिवसांपासून सलमान खान 'राजा शिवाजी' सिनेमात दिसणार की नाही? या गोष्टीची चर्चा होती. त्यामुळे ट्रेलरमध्ये भाईजानच्या भूमिकेची झलक पाहायला मिळणार का, याचीही प्रेक्षकांना उत्सुकता आहे.
'राजा शिवाजी' सिनेमाचं अँथम साँग प्रचंड गाजलं. आता ट्रेलरमध्ये आणखी काही गाण्यांची झलक प्रेक्षकांसमोर निश्चितच येतील. अजय-अतुल यांनी संगीतबद्ध गेलेली गाणी ऐकायला प्रेक्षकांचे कान आतुर झाले आहेत. त्यामुळे 'राजा शिवाजी'च्या ट्रेलर लाँच सोहळा खूप खास असणार आहे.
रितेश विलासराव देशमुख लिखित व दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ या चित्रपटात दिग्गज कलाकारांची फळी एकत्र आली आहे. यामध्ये संजय दत्त, अभिषेक बच्चन, विद्या बालन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, बोमन इराणी, भाग्यश्री, फरदीन खान, जितेंद्र जोशी, अमोल गुप्ते, जिनिलिया देशमुख आणि रितेश विलासराव देशमुख यांचा समावेश आहे. 'जिओ स्टुडिओज' प्रस्तुत आणि 'मुंबई फिल्म कंपनी' निर्मित, ज्योती देशपांडे व जिनिलिया देशमुख निर्मित ‘राजा शिवाजी’ हा भव्य ऐतिहासिक चित्रपट १ मे २०२६ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.