​प्रार्थना बेहरे आणि वैभव तत्त्ववादी व्हॉट्सअॅप लग्नमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2017 08:56 AM2017-06-08T08:56:31+5:302017-06-08T14:26:31+5:30

प्रार्थना बेहरे आणि वैभव तत्त्ववादी यांनी कॉफी आणि बरंच काही आणि मिस्टर अॅण्ड मिसेस सदाचारी यांसारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम ...

Prayer Behind and Glorious Principle Wotsapp | ​प्रार्थना बेहरे आणि वैभव तत्त्ववादी व्हॉट्सअॅप लग्नमध्ये

​प्रार्थना बेहरे आणि वैभव तत्त्ववादी व्हॉट्सअॅप लग्नमध्ये

googlenewsNext
रार्थना बेहरे आणि वैभव तत्त्ववादी यांनी कॉफी आणि बरंच काही आणि मिस्टर अॅण्ड मिसेस सदाचारी यांसारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. या दोघांची जोडी प्रेक्षकांना खूपच आवडते. कॉफी आणि बरंच काही या चित्रपटातील त्यांच्या केमिस्ट्रीची तर प्रचंड चर्चा झाली होती. त्यांच्या फॅन्सना तर प्रार्थना आणि वैभवची जोडी खूपच आवडते. त्यांनी पुन्हा चित्रपटात काम करावे अशी त्यांच्या फॅन्सची गेल्या कित्येक महिन्यांपासूनची इच्छा आहे. 
प्रार्थना आणि वैभवच्या फॅन्सची ही इच्छा पूर्ण होणार असल्याचे वैभवने काही दिवसांपूर्वी ट्विटर या सोशल नेटवर्किंगद्वारे त्याच्या फॅन्सना सांगितले होते. वैभवने त्याच्या ट्विटरच्या अकाऊंटवर प्रार्थनासोबतचा एक फोटो शेअर केला होता आणि या फोटोत त्याने म्हटले होते की, खूप मोठ्या कॉफी ब्रेकनंतर मी प्रार्थनासोबत एक नवा चित्रपट करत आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला मी लवकरच सुरुवात करणार आहे. वैभवने ट्विटरमध्ये ज्या चित्रपटाचा उल्लेख केला होता, तो चित्रपट व्हॉट्सअॅप लग्न असून या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच लाँच करण्यात आले आहे.
प्रार्थना आणि वैभवची प्रमुख भूमिका असलेल्या व्हॉट्सअॅप लग्न या चित्रपटाचा पहिला पोस्टर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या पोस्टरमध्ये आपल्याला प्रार्थना आणि वैभव सेल्फी काढताना दिसत आहेत तर त्यांच्यासमोर एक टेबल आणि त्यावर दोन कप आहेत. त्यांच्या चित्रपटाचा हा पोस्टर पाहाता व्हॉट्सअॅप लग्न हा एक रोमँटिक चित्रपट असल्याचे आपल्याला दिसून येत आहे.
कॉफी आणि बरेच काही या चित्रपटानंतर कॉफी आणि बरेच काही या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीस यावा अशी सगळ्यांचीच इच्छा आहे. वैभव आणि प्रार्थनाला या चित्रपटाच्या सिक्वलबाबत नेहमीच विचारले जाते. या चित्रपटानंतरच त्या दोघांच्या फॅन फॉलॉव्हिंगमध्ये प्रचंड वाढ झाली आहे.

Web Title: Prayer Behind and Glorious Principle Wotsapp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.