​हा पाहा सायली संजीवचा लहानपणीचा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2017 16:08 IST2017-06-05T10:36:18+5:302017-06-05T16:08:27+5:30

काहे दिया परदेस या मालिकेमुळे सायली संजीव हे नाव आज घराघरात पोहोचले आहे. या मालिकेत ती साकारत असलेली गौरी ...

This photo of Sallyi Sanjeev's childhood photo | ​हा पाहा सायली संजीवचा लहानपणीचा फोटो

​हा पाहा सायली संजीवचा लहानपणीचा फोटो

हे दिया परदेस या मालिकेमुळे सायली संजीव हे नाव आज घराघरात पोहोचले आहे. या मालिकेत ती साकारत असलेली गौरी ही भूमिका प्रेक्षकांना खूपच आवडत आहे. सायली संजीवने या मालिकेत झळकण्याआधी काही चित्रपटांमध्ये काम केले होते. पण तिला या मालिकेने खरी लोकप्रियता मिळवून दिली. 
सायलीचे बालपण नाशिकमध्ये गेले आहे. ती अभिनेत्री होईल असा तिने कधी विचारदेखील केला नव्हता. तिला स्वतःला पॉलिटिकल सायन्समध्ये प्रचंड रस होता. तिला पॉलिटिकल अॅनालिसिस्ट बनायचे होते. पण कॉलेजमध्ये असताना एका एकांकिकेत तिने काम केले होते. त्या एकांकिकेसाठी तिला राज्यस्तरावर पुरस्कार मिळाला. त्या एकांकिकेला प्रवीण तरडे परीक्षक म्हणून आले होते. तू स्क्रिनवर छान दिसशील, ऑडिशन्स दे असे ते तिला म्हणाले आणि या एकांकिकेमुळे तिचा अभिनयप्रवास सुरू झाला. तिने सुरुवातीच्या काळात काही जाहिरातींमध्ये काम केले. प्रियांका चोप्रासोबतदेखील ती एका जाहिरातीमध्ये झळकली होती. त्यानंतर तिने पोलिसलाइन या चित्रपटात काम केले आणि यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिले नाही.
सायली संजीवने तिच्या इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साइटवर नुकताच तिचा लहानपणीचा फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत ती केवळ एक-दोन वर्षाची आहे. ती या फोटोत खूपच गोंडस दिसत आहे. या फोटोत तिच्यासोबत तिची आई आणि आजी देखील पाहायला मिळत आहेत. 

sayalee sanjeev childhood picture

काहे दिया परदेस या मालिकेमुळे सायलीला प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. पण या मालिकेचे ऑडिशन दिल्यानंतर या मालिकेत काम करायचे नाही असे तिने ठरवले होते. तिच्या फेसबुकवर एक मेसेज आला होता की, क्या आप अॅक्टिंग करते हो आणि त्यावर तिने हो बोलल्यानंतर तिला मालिकेच्या ऑडिशनविषयी सांगण्यात आले. ऑडिशन दिल्यानंतर या भूमिकेसाठी तिची निवड झाली. पण त्याचवेळी तिच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आला आणि तिला जास्तीत जास्त वेळ हा त्यांना द्यायचा होता. पण मालिकेचे दिग्दर्शक अजय मयेकर आणि झी मराठी वाहिनीच्या मंडळींनी तिला खूप समजावले. तुला पाहिजे तेवढा वेळ तू त्यांना दे असे तिला सांगितले आणि त्यांच्यामुळेच तिने ही मालिका स्वीकारली. 

Web Title: This photo of Sallyi Sanjeev's childhood photo