बाबो..! मासेमारीच्या जाळ्यात माशांऐवजी फसली ही अभिनेत्री, दिसली बिकनीमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2020 13:50 IST2020-01-06T13:49:58+5:302020-01-06T13:50:27+5:30

मराठमोळ्या या अभिनेत्रीने हिंदी व मराठी मालिकेत काम केलं आहे.

OMG..! Marathi actress Manjiri Pupala is seen in a bikini instead of a fish in a fishing net | बाबो..! मासेमारीच्या जाळ्यात माशांऐवजी फसली ही अभिनेत्री, दिसली बिकनीमध्ये

बाबो..! मासेमारीच्या जाळ्यात माशांऐवजी फसली ही अभिनेत्री, दिसली बिकनीमध्ये

'दिल दोस्ती दुनियादारी' ही झी वाहिनीवरील मालिका चांगलीच गाजली होती. या मालिकेतील सुजय, कैवल्य, आशु, अॅना, मीनल, रेश्मा, राकेश, सॅम, किंजल, निशा, रेवा, कबीर या सगळ्याच भूमिका प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्या होत्या. आज ही मालिका संपून काही वर्षं लोटली असली तरी ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच स्मरणात आहे. या मालिकेतील 'निशा' तुम्हाला आठवतेय का? या मालिकेत ती राकेशच्या प्रेयसीच्या भूमिकेत झळकली होती. तिची व्यक्तिरेखा प्रेक्षकांना चांगलीच भावली होती. ही व्यक्तिरेखा अभिनेत्री मंजिरी पुपालाने साकारली होती. मंजिरीला या मालिकेमुळे चांगलीच लोकप्रियता मिळाली होती. 

मंजिरी सोशल मीडियावर सक्रीय असून ती फोटो शेअर करत असते. मात्र नुकताच इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोमुळे सोशल मीडियावर खळबळ माजली आहे.
या फोटोत मंजिरी मासेमारीच्या जाळ्यात पहायला मिळते. या फोटोत ती बिकनीमध्ये दिसते आहे. तिने हे अंडरवॉटर फोटोशूट केलं असून यात ती खूपच बोल्ड दिसते आहे.


मंजिरीने दिल दोस्ती दुनियादारी मालिकेनंतर ग्रहण या मालिकेत ती झळकली. याशिवाय ती मराठी चित्रपट पार्टीमध्येही महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती.

तसेच हिंदी टेलिव्हिजनवरील ‘इश्कबाझ - प्यार की एक धिंचाक कहानी’ या मालिकेत तिने एसीपी आदिती देशमुखची भूमिका साकारताना दिसली होती. 

Web Title: OMG..! Marathi actress Manjiri Pupala is seen in a bikini instead of a fish in a fishing net